ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे  अनाथालय व वृध्दाश्रमात फराळ वाटप

इचलकरंजी -WATCH TEAM  येथील विक्रमनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नवचैतन्य अनाथालयातील मुले आणि समाधान वृध्दाश्रमातील वृध्दांसाेबत दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला. संघटनेच्या वतीने दाेन्ही ठिकाणी फराळाचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून माणुसकीची वीण घट्ट करणाऱ्या  या उपक्रमाचे काैतुक हाेत आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने दिवाळी सणाचा आनंद अनाथालय आणि वृध्दाश्रम येथे साजरा करण्यात आला. नगरसेवक तथा सभागृह नेते विठ्ठल चाेपडे, जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष राजाराम बाेंगार्डे, विष्णूपंत नेतले, श्रीनिवासजी भट्टड, गंगाराम जाधव आदींच्या हस्ते दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे संघटनेचे अध्यक्ष राजाराम बाेंगार्डे यांनी आढावा घेतला.

नवचैतन्य अनाथालय येथे मुले, शिक्षक व कर्मचारी तसेच समाधान वृध्दाश्रमातील वृध्दांना दिपावलीचा फराळ देण्यात आला. यावेळी संघटनेचे नारायण दुरुगडे, कल्लाप्पा कांबळे, बाळासाहेब हाेगाडे, श्रीशैल बिळ्ळुर, अजमुद्दीन मुल्ला, अरुण पुजारी, साै. बिसमिल्ला गैबान, माने आदींसह पदाधिकारी, सभासद उपस्थित हाेते.