आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांसमवेत साजरी केली दिवाळी…

सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संदेश

गारगोटी प्रतिनिधी – दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रेम आणि बंधुभावाचा सण. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सण साजरा करण्याच्या भावनेतून राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बेडीव पैकी धनगरवाडा (ता.भुदरगड) धनगर समाज बांधवांसमवेत दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला.

यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये आपुलकी, एकोपा आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, असे त्यांनी सांगितले. धनगर समाज बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांनी आनंद व्यक्त केला. या भेटीमुळे समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

तसेच धनगर बांधवांच्या दैनंदिन अडचणी, आरोग्यविषयक सुविधा, तसेच वाड्या-वस्त्यांवरील प्रश्न त्यांनी जाणून घेतले. डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या बांधवांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी धनगर समाजातील बांधवांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे स्वागत करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी गोकुळचे माजी संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषि विद्यापिठाचे सदस्य दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, सभापती विक्रमसिंह पाटील, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट, पंचायत समिती सदस्य सुनिल किरोळकर, प्रशांत देसाई, युवराज फगरे, मुरलीधर बुवा, राजाराम भराडे, गणपतरराव शेटके, मारुती पाटील, रघुनाथ बोटे, मारुती भराडे, आनंदराव शेवाळे, रावसाहेब पाटील, चंद्रकांत गुरव, आनंदा मिटके, राजेंद्र भोसले, सागर मिसाळ यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व धनगर बांधव उपस्थित होते.