इचलकरंजी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

डीकेटीई संस्थेच्या ४०० हून अधिक शिक्षकांचा मेळावा; कार्यकारी संचालक रवी आवाडे यांच्याकडून ठाम पाठिंबा

इचलकरंजी-TEAM WATCH : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला इचलकरंजी परिसरात चांगली गती मिळत असून, विविध शाळा व महाविद्यालयांतील शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेविका डॉ. श्रुती जोशी यांनी परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देत शिक्षकांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
डीकेटीई संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षकांचा संयुक्त मेळावा डी.के.टी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज, राजवाडा, इचलकरंजी येथील सभागृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला ४०० हून अधिक शिक्षक उपस्थित होते. डीकेटीईचे कार्यकारी संचालक रवी आवाडे यांनी कौस्तुभ गावडे यांना ठाम पाठिंबा व्यक्त केला. संस्थेतील शिक्षक व प्राध्यापक त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना भरघोस मतांनी विजयी करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. श्रुती जोशी यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधताना कौस्तुभ गावडे यांनी शिक्षण क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेतला. शिक्षकांच्या विविध प्रश्नांची जाण असलेले युवा नेतृत्व म्हणून त्यांची भूमिका स्पष्ट करतानाच, भविष्यात शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मांडलेल्या संकल्पनांची माहिती दिली. शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पाठपुरावा करणारे नेतृत्व विधान परिषदेत पोहोचणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला दिलेल्या भेटीदरम्यान संस्थेचे अध्यक्ष शितल मणेरे यांनी कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला पाठिंबा व्यक्त केला. गावडे हे शिक्षण व्यवस्थेची आणि शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेले युवा नेतृत्व असून, शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्था आणि शिक्षक त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान डॉ. श्रुती जोशी यांनी कौस्तुभ गावडे यांच्या कार्याची आणि शिक्षकांसाठीच्या भूमिकेची माहिती दिली. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी अनिलकुमार मणेरे, समन्वयक अशोक वसगडे, मुख्याध्यापिका पुष्पा ऐनापुरे आणि प्राचार्या वैशाली मंगसुळे उपस्थित होते.
याशिवाय डॉ. जोशी यांनी इचलकरंजी परिसरातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि शिक्षकांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत कौस्तुभ गावडे यांची भूमिका त्यांनी शिक्षकांसमोर मांडली. या संवादाला शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने परिसरातील प्रचाराला अधिक बळ मिळत आहे.

या प्रचार दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र सूत गिरणीचे चेअरमन राजू मगदूम, प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, डॉ. एस. टी. इंगळे, डॉ. धीरज शिंदे, प्रा. शशिकांत कुंभार, प्रा. विनायक भोई, प्रा. रोहित शिंगे, प्रा. प्रथमेश गवळी यांच्यासह गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण, शिक्षकांशी थेट संवाद आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्याची भूमिका या मुद्द्यांवर कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला इचलकरंजी परिसरात गती मिळत असल्याचे या प्रचार दौऱ्यातून दिसून आले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.