आदिमाये, जनतेचं भलं कर! (भाग १) : राजकीय गदारोळात समाजकारणाचा ‘घट’ जपायचा कुणी?

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
कोल्हापूर: TEAM WATCH
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दरबारात घटस्थापना झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र आदिमायेच्या भक्तीत लीन झाला आहे. नऊ दिवस अखंड जळणाऱ्या नंदादीपाप्रमाणे समाजातही सुख, शांती आणि समृद्धीचा प्रकाश राहावा, हीच प्रत्येक भक्ताची प्रार्थना आहे. पण मंदिरात भक्तीचा जागर सुरू असताना, मंदिराबाहेरच्या जगात मात्र राजकारण आणि समाजकारणाचा एक वेगळाच ‘गदारोळ’ सुरू आहे. निवडणुकांचे वारे वाहत आहेत, राजकीय महत्त्वाकांक्षांचे फड रंगत आहेत. अशा या धामधुमीत सर्वसामान्य माणसाच्या हिताचा ‘घट’ नेमका कुणी आणि कसा जपायचा, हा आजच्या घडीचा सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे.
राजकारण हा लोकशाहीचा पाया आहे आणि समाजकारण हा त्याचा आत्मा. परंतु, आजच्या सद्यपरिस्थितीकडे पाहिल्यावर असं वाटतं की, राजकारणाच्या अतिरेकामुळे समाजकारणाचा आत्मा कुठेतरी गुदमरतोय. नेत्यांची भाषणं, आश्वासनांची खैरात, पक्षांतरांचे खेळ आणि सोशल मीडियावरील आरोपांच्या फैरी यातून सामान्य माणसाला काय मिळतं? रेशन दुकानावर धान्यासाठी रांगेत उभा असलेला गरीब, जुनी पेन्शनसाठी लढणारा शिक्षक, महागाईच्या चक्रव्यूहात अडकलेला मध्यमवर्गीय आणि सुरक्षिततेसाठी धास्तावलेली महिला—या सर्वांचे प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहेत.
नवरात्रीचा उत्सव हा केवळ उपवास आणि गरब्यापुरता मर्यादित नाही. तो शक्तीच्या उपासनेचा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा आणि समाज कल्याणाचा सण आहे. महिषासुरासारख्या प्रवृत्तींचा नाश करून देवीने सृष्टीचे रक्षण केले होते. आजच्या समाजातली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि अश्लीलतेचा वाढता डिजिटल कचरा हेच आधुनिक ‘महिषासूर’ आहेत. या असुरी प्रवृत्तींवर मात करण्यासाठी आजच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला सद्बुद्धी मिळणे गरजेचे आहे.
म्हणूनच, या नवरात्रीच्या पहिल्या माळेला आदिमायेच्या चरणी एकच आर्त साकडं घालावंसं वाटतं— “हे जगदंबे, आमच्या नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांना लोककल्याणाची बुद्धी दे. राजकारणातील स्वार्थ बाजूला ठेवून तळागाळातील माणसाच्या डोळ्यांतील पाणी पुसण्याची शक्ती त्यांना लाभू दे. विनाकारण पब्लिसिटीच्या मागे धावणाऱ्या या युगात, मुंगीच्या आणि कासवाच्या गतीने का होईना पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या हातांना बळ दे. हे आदिमाये… या सणासुदीला माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक घराचे, शेतकऱ्याचे आणि सामान्य भक्ताचे भलं कर!”


Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.