पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

रविवारपासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ
10 दिवस कोल्हापूरवासियांना विविध उपक्रमांची मेजवानी
कोल्हापूर TEAM WATCH: रविवार 11 ऑक्टोबर या दिवसापासून शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. या महोत्सवाचे भवानी मंडप येथे सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
यावेळी भवानी मंडप परिसरात शाहिरी पोवाडा,मर्दानी खेळ हे नामवंत कलावंतांकडून तर दसरा महोत्सवाबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती देणारे भाषण वक्त्याकडून सादर करण्यात येणार आहे .
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
या नवरात्र महोत्सवात जिल्हा प्रशासनातर्फे 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूरवासियां साठी विविध उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.या महोत्सवातंर्गंत येत्या सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळां, महाविद्यालयांमध्ये पारंपारिक वेशभूषा हा उपक्रम घेण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनीं पालक,शिक्षक आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.तसेच तरुणाईने या उपक्रमाचे विविध रिल्स बनवावेत.
नवरात्रोत्सव २०२६ : करवीर निवासिनीच्या दरबारात अवतरली फुलांची पंढरी!
३ हजार किलो विदेशी फुले अन् फळांनी महालक्ष्मी मंदिर सजले;
कोल्हापुरात भक्तांची मांदियाळी
कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापुरातील ऐतिहासिक श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह सुरू झाला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भक्तांनी कोल्हापुरात गर्दी केली आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे यंदा अंबेच्या दरबारात करण्यात आलेली तब्बल ३ हजार किलो सुवासिक फुले आणि फळांची विलोभनीय सजावट! या अलौकिक पुष्पसजावटीमुळे संपूर्ण मंदिर परिसर जणू फुलांच्या पंढरीत न्हाऊन निघाला आहे.
प्रथम दिवसाची खास ‘ऑरेंज थीम’ नवरात्राच्या पहिल्या माळेच्या विशिष्ट रंगाचा मान राखत यंदा गाभाऱ्यात आणि मुख्य मंदिर परिसरात प्रामुख्याने भगव्या व पिवळ्या धमक झेंडूच्या फुलांची विशेष थीम तयार करण्यात आली होती. मंदिराची मुख्य ऐतिहासिक महाद्वारे, दर्शन रांगा, गरुड मंडप आणि पाषाणी खांबांवर या फुलांचे देखणे तोरण बांधण्यात आले आहे. फुलांच्या नैसर्गिक सुवासासोबतच संपूर्ण मंदिरावर करण्यात आलेल्या अत्याधुनिक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी मंदिराचे रूप अधिकच नयनरम्य दिसत आहे.
|
गुरुवार ,15 ऑक्टोबर रोजी खास महिलांची बाईक रॅली आयोजित करण्यात येणार आहे. या बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी या उपक्रमाच्या अनुषंगाने रिल्स बनवावेत आणि विविध समाज माध्यमांवर प्रसारित करावेत त्याचबरोबर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने हे रिल्स शेअर करण्यासाठी लिंक बनविण्यात आली असून त्या लिंकवर हे विविध रिल्स पाठवावेत,जेणेकरून या शाही दसरा महोत्सवाच्या विविध उपक्रमांची माहिती संपूर्ण राज्य किंबहुना देशभर होण्यास मदत होईल.
रिल्सच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे बनवण्यात आलेली लिंक खाली दिली आहे . Link https://forms.gle/e8RZGeaWJUSngPCQ8
या लिंकवर संबंधितांनी रिल्स पाठवावेत असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 18