पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
TEAM WATCH: टेकप्रेमींसाठी ऑक्टोबर महिना अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा ठरणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘ॲपल’ (Apple) या महिन्यात दोन मोठे मेगा इव्हेंट्स आयोजित करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, कंपनीचे नवीन सीईओ जॉन टर्नस यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच मोठा लाँचिंग टप्पा असणार आहे. यामध्ये कंपनी तंत्रज्ञानाचा एक नवा अध्याय सुरू करत आपला पहिलावहिला टचस्क्रीन मॅकबुक प्रो आणि नवीन आयपॅड मिनी जगासमोर आणू शकते.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ऑक्टोबरच्या अखेरीस (संभाव्यतः २७ ऑक्टोबरला) होणाऱ्या मुख्य इव्हेंटमध्ये शक्तिशाली M6 चिपसेट असलेले नवीन मॅकबुक आणि आयमॅक मॉडेल्स सादर केले जातील. हा सोहळा ऑनलाइन व्हिडिओ प्रेझेंटेशनसोबतच प्रत्यक्ष प्रेस सेशनच्या स्वरूपात रंगणार असून, क्रिएटिव्ह प्रोफेशनल्ससाठी हा इव्हेंट एक पर्वणी ठरेल.
मॅकबुकमध्ये पहिल्यांदाच ‘डायनॅमिक आयलंड’ आणि OLED डिस्प्ले
या नव्या टचस्क्रीन मॅकबुक प्रोमध्ये (कोडनेम: K114 आणि K116) सध्याच्या मॉडेल्सच्या तुलनेत अत्यंत हलके डिझाइन आणि आकर्षक OLED डिस्प्ले पाहायला मिळेल. सर्वात मोठी आणि उत्सुकतेची गोष्ट म्हणजे, आयफोन गाजवणारे ‘डायनॅमिक आयलंड’ (इंटरॲक्टिव्ह विजेट) तंत्रज्ञान आता पहिल्यांदाच मॅकबुकमध्येही दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, आयपॅड मिनीला (J510) देखील OLED स्क्रीन आणि चांगल्या व्हिडिओ कॉलिंगसाठी लँडस्केप फ्रंट कॅमेऱ्याचे मोठे अपग्रेड मिळणार आहे.
|
१३ ऑक्टोबरला सजणार ‘स्मार्ट होम’ इव्हेंट
मॅक आणि आयपॅडच्या लाँचपूर्वी, ॲपल १३ ऑक्टोबर रोजी आपला विशेष ‘स्मार्ट होम’ कार्यक्रम घेणार आहे. यामध्ये डिस्प्ले असलेला ॲपलचा पहिला वहिला ‘स्मार्ट होम हब’, नवीन होमपॉड मिनी आणि अपडेटेड ॲपल टीव्ही सादर केला जाऊ शकतो. या सर्व आधुनिक स्मार्ट उपकरणांना अधिक सुलभतेने नियंत्रित करण्यासाठी ‘सिरी’ (Siri) मुख्य आणि अत्यंत प्रभावी भूमिकेत दिसणार आहे.
ॲपलच्या या नव्या आणि सकारात्मक क्रांतीमुळे युजर्सचा डिजिटल अनुभव अधिक सोपा, वेगवान आणि प्रगत होणार आहे.
|
|
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
Post Views: 14