प्रा. वैशाली तानाजी साळुंके यांना पीएचडी पदवी प्रदान!

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

प्रा. वैशाली तानाजी साळुंके यांना पीएचडी पदवी प्रदान

नाशिक: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या वैशाली तानाजी साळुंके यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी “डेव्हलपमेंट ऑफ झिंक ऑक्साइड थिक फिल्म बेस्ड सेन्सर प्रोटोटाइप अँड इट्स अप्लिकेशन्स फॉर गॅस अँड ह्युमिडिटी सेन्सिंग” या विषयावर विद्यापीठात प्रबंध सादर केला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

त्यांना निमगांव येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक सायन्स संशोधन केंद्रात संशोधनकार्य पूर्ण केले. यावेळी चेअरमन म्हणून प्रो. डॉ. विकास मठे इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, तर रेफ्री म्हणून प्रो. डॉ. संदिप वाघुले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे उपस्थित होते.

प्रा. डॉ. वैशाली साळुंके यांच्या या यशाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, डॉ. अद्वय हिरे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे एल. व्ही. एच. महाविद्यालय नाशिक, म. स. गा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. मनीष सोनवणे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व सहकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.