४१ वर्षांचा रक्तदानाचा अखंड संकल्प… बहिरेवाडीच्या वसंतराव चव्हाण यांची सव्वाशेकडे वाटचाल; सेवाभावी कार्याला पतसंस्था परिवाराचा भक्कम पाठिंबा…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

स्वतः १२५ हून अधिक वेळा रक्तदान, शेकडो रक्तदाते घडविले; मानवतेच्या सेवेत आयुष्य समर्पित

कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वसंतराव चव्हाण यांनी गेल्या ४१ वर्षांत नियमित रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वसंतराव चौगुले पतसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी केवळ स्वतः रक्तदान केले नाही, तर शेकडो नागरिक आणि कर्मचाऱ्यांना रक्तदानासाठी प्रेरित करून एक सामाजिक चळवळ उभी केली. स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या विचारांतून प्रेरणा घेतलेल्या चव्हाण यांनी रक्तदानाला जीवनाचे ध्येय मानले. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी त्यांनी वेळोवेळी रक्तदान केले असून अनेक रक्तदान शिबिरांच्या आयोजनातही मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्यामुळे असंख्य रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत झाली.

वसंतराव चौगुले पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, उद्योगपती सुभाष चौगुले, सरव्यवस्थापक एम. एस. पाटील तसेच संचालक मंडळाने रक्तदान चळवळीला सातत्याने प्रोत्साहन दिले. संस्थेच्या या सकारात्मक भूमिकेमुळे शंभरहून अधिक कर्मचारी नियमित रक्तदानाशी जोडले गेले आहेत. संस्थेतील सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक दृढ करण्यात वसंतराव चव्हाण यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. कुटुंबीयांचेही त्यांना मोठे सहकार्य लाभले आहे. पत्नी, मुली, जावई आणि नातेवाईकांनी रक्तदानाचा संदेश स्वीकारत समाजसेवेच्या या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे रक्तदान ही केवळ वैयक्तिक सवय न राहता एक कौटुंबिक संस्कृती बनली आहे.

आज रक्ताच्या एका पिशवीसाठी अनेक रुग्ण संघर्ष करत असताना वसंतराव चव्हाण यांच्यासारखे रक्तदाते समाजासाठी आशेचा आधार ठरत आहेत. त्यांचे कार्य हे केवळ विक्रम नसून मानवतेची जपलेली नाळ आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण आहे. तुमची ४/५ लाईनच एक प्रतिक्रिया पाठवा. आताचे वय. अजून भविष्यात किती वेळा ब्लड देणार. एखादी गोष्ट सुरू करण सोप असतं, पण खरा कस लागतो सातत्य टिकवायला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.