महापालिकेत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व! चारही प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड; संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रभाग समिती सभापतीपदी वैभव कुंभार, अनुराधा खेडकर, संजय मोहिते, विशाल चव्हाण यांची बिनविरोध निवड

काेल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 च्या सभापतीपदी अनुक्रमे वैभव अविनाश कुंभारअनुराधा सचिन खेडकरसंजय मोहिते व विशाल शिवाजी चव्हाण यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

          उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्याप्रभाग समिती क्रमांक 1 गांधी मैदानक्रमांक 2 छत्रपती शिवाजी मार्केटक्रमांक 3 राजारामपुरी जगदाळे हॉल आणि क्रमांक 4 ताराराणी मार्केट या विभागीय कार्यालयांसाठी सभापती पदाकरिता प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.

            बैठकीच्या प्रारंभी विभागीय कार्यालयनिहाय सभा अध्यक्षांनी अर्जांची छाननी करून सर्व अर्ज वैध असल्याचे घोषित केलेत्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आलामात्रएकमेव उमेदवारी अर्ज असल्याने सर्व चारही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

          निवडीनंतर उपजिल्हाधिकारी संपत खिलारीमहापौर सौरुपाराणी निकमस्थायी समिती सभापती विशाल शिराळेमहिला व बालकल्याण समिती सभापती सौकौसर बागवानउपसभापती सौदिपा ठाणेकरगटनेते मुरलीधर जाधवविरोधी पक्षनेते राजेश लाटकरगटनेते शारंगधर देशमुखआदील फरासउपआयुक्त किरणकुमार धनवाडेनगरसचिव सुनिल बिद्रे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.