आबिटकर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना डॉ.क्षितीजा सोमन समोर उपस्थित विद्यार्थीनी.

गारगोटी प्रतिनिधी – ‘युवा ग्रामीण विकास संस्था’ संचलित, श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पाल) येथे जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांची शक्ती, त्यांचे अतुलनीय यश आणि समाजातील योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन आणि दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून जेमिनस टेक प्रायव्हेट लिमिटेड व जेमिनस स्पेस सॉफ्टवेअर (पुणे) येथील फायनान्स आणि अकाउंट्स विभागाच्या प्रमुख सीए डॉ.क्षितीजा राहुल सोमन उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रोहिणी अर्जुन आबिटकर होत्या.

यावेळी बोलताना जेमिनस स्पेस सॉफ्टवेअर (पुणे) अकाउंट्स विभागाच्या प्रमुख सीए डॉ. क्षितीजा सोमन म्हणाल्या, आजच्या आधुनिक युगात महिलांनी शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान उद्योग आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. विशेषतः अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रात मुलींनी आत्मविश्वासाने पुढे येऊन आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्यांनी पुढे सांगितले की महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर प्रत्येक मुलगी आपल्या स्वप्नांना पूर्ण करू शकते. तसेच विद्यार्थिनींना प्रेरणा देताना त्यांनी आवाहन केले की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन संशोधन नवकल्पना आणि नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या अर्चना निकम, पंचायत समिती सदस्या अरुणा देसाई, कल्याणी फगरे, ॲडव्हायझर धिरज देसाई, मॅनेजमेंट प्रतिनिधी धिरज गुदगे उपस्थित होते. पॉलिटेक्निक विभागाच्या प्रमुख प्रा. कविता कुरळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. प्राध्यापक हेमंत शिंदे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आश्विनी देसाई यांनी केले, तर प्रा.उत्कर्षा नन्नवरे यांनी आभार मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.