नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पासून मुस्लिम समाजाचा सर्व क्षेत्रांमध्ये विकास – जमाल सिद्दिकी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पासून मुस्लिम समाजाचा सर्व क्षेत्रांमध्ये विकास – जमाल सिद्दिकी

कोल्हापूर :(शिरोली-रुपेश आठवले ) राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा  जमाल भाई व इद्रिसभाई मुलतानी प्रदेश अध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांचा संयुक्त दौरा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज झाला. पेठ वडगाव येथे अल्पसंख्यांक मोर्चा च्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आले होती. यावेळी भाजपा सदस्य नोंदणी महाअभिमान 2025 अंतर्गत कार्यशाळा व नूतन आमदार यांचा सत्कार समारंभ हॉटेल जिप्सी येथे पार पडला.या कार्यक्रमावेळी बोलताना जमाल भाई सिद्दिकी  म्हणाले की नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेपासून मुस्लिम समाजाचा सर्व क्षेत्रांमध्ये विकास होत आहे. प्रत्येक योजनेचा लाभ मुस्लिम समाजास मोठ्या संख्येने मिळत आहेत. मुस्लिम समाज मोठया संख्येने भाजपाशी जोडला जात आहे. सदस्य नोंदणी मध्ये जास्तीत जास्त मुस्लिम समाजास भाजपशी जोडावे असे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन तय्यब कुरेशी जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व यांनी केले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

या कार्यक्रमास आकाशा मुल्ला प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा, अश्रफ वांकर पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आझम जमादार कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष, अमरसिंह पाटील तालुकाध्यक्ष भाजपा हातकणंगले,सलीम मुलाणी तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा,विश्वास माने तालुकाध्यक्ष युवा मोर्चा, सौ बाणू दीदी नदाफ महिला मोर्चा तालुकाध्यक्ष ,शाहरुख गडवाले सरचिटणीस कोल्हापूर महानगर, मुमताज कनवाडे पश्चिम महाराष्ट्र सह प्रमुख महिला, सुहास राजमाने,सलीम महात,सरचिटणीस औरंग शेख, रियाज सनदे,फिरोज बांगी,इम्तियाज मुजावर,शकील मुजावर, रेश्मा शेख जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा ,अली खान इचलकरंजी शहर अध्यक्ष, रमजान मुजावर,प्रज्योत शहा,बंडा गोंदकर,,शहर अध्यक्ष जगन्नाथ माने, आयुब पठाण,राजकुमार मिठारी,रघुनाथ पिसे,अर्षद तांबोळी,हणमंत हिरवे,प्रथमेश शिंदे,निलेश कांबळे,प्रदनजा गुहाघरकर,सय्यद अली देसाई,होते स्वागत व प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी यांनी केले तर आभार जिल्हा सचिव आरिफ सर्जेखान यांनी केले

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.