थंडगार पेय, रस्त्यावर… ट्रक पलटी, बाटल्यांचा थर!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शीत पेय घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी
प्रतिनिधी (रुपेश आठवले)- शीत पेय घेऊन जाणारा ड्रायव्हरचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला ही घटना  दुपारी 4 च्या सुमारास घडली.

पुणे बेंगलोर महामार्ग वर ट्रक (नंबर MH 16-8250 ) अहमदनगर हून तो कोल्हापूर मुडशिंगी वेअर हाऊस येथे निघाला होता. ट्रक मध्ये विविध प्रकारचे शीतपेये होते. ड्रायव्हरचा वाहनावरील ताबा सुटून ट्रक शिरोली एमआयडीसी जवळील मयूर फाटा जवळ सुमारे वीस फूट खोल सर्विस रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने त्या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ नव्हती.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नशीब बलवत्तर तर म्हणून ड्रायव्हरचे प्राण वाचले. ड्रायव्हरच्या म्हणण्याप्रमाणे ट्रकच्या आडवी टू व्हीलर गाडी आली होती,म्हणून ती चुकवण्यासाठी ड्रायव्हरच्या ट्रक वरील ताबा सुटून ट्रक पलटी झाला. या घटनेमध्ये ट्रक व शीतपेये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची नोंद  शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.