प्रतिसाद!राजू मामा सोशल फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबिर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

नागाव :रुपेश आठवले 

*राजू मामा सोशल फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिराला प्रतिसाद

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

नागाव तालुका हातकलंगले येथे कै. राजेंद्र नागू यादव उपसरपंच नागाव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा दिनानिमित्त *राजूमामा सोशल फाउंडेशन* तर्फे आरोग्य शिबिराला उत्सु्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम गावातील खणाईदेवी मंदिर परिसरातील हॉलमध्ये घेण्यात आला. त्या कार्यक्रमांमध्ये परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. हा कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. या शिबिरामध्ये 400 जणांनी  लाभ घेतला.
सर्वप्रथम राजू मामाच्या फोटो पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
“राजू मामा सोशल फाउंडेशन” हे सामान्य गरीब युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या सेवेसाठी कायम तत्पर कार्यरत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, पुरंदर पाटील मामा यांनी शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, संजय वडार , भरत पाटील, सुनील कांबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सतीश लंबे ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन साळुंकुरे, अजित घाटगे, विजय पाटील, भीमराव खाडे, माजी सरपंच अरुण माळी व गावातील सेवा सोसायटी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
तसेच या शिबिरासाठी अजिंक्य यादव, सागर शिंदे, भाऊ घाटगे, रुपेश आठवले, सहील मिनेकर, ऋतिक मिणेकर यांनी योगदान केले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.