|
…नर्मदा-कार्तिक यांच्यामुळेच मोठी होते कोल्हापूर: (मंजुनाथ-टीम पॉझिटीव्ह मेंबर) आजच्या धकाधकीच्या आणि पैशाच्या मागे लागलेल्या दुनियेत, प्रामाणिकपणा- एकनिष्ठपणा मागे पडत चालला आहे, अशीच अनेकांची भावना समाजात वाढिस लागलेली असताना, त्याला “नर्मदा-कार्तिक”अपवाद ठरली आहे. या ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करणारे धिरेंद्र प्रभा घरड यांचे महत्वाचे कागदपत्र असलेले पैशाचे पाकीट विसरले. त्यामुळे त्यांच्या मनाची चंचलता वाढली. त्यांनी तातडीने ज्या “नर्मदा-कार्तिक” ट्रॅव्हल्स मधून आलो त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाचा नंबर नसल्यामुळे ते थोडे अस्वस्थ झाले. तरीही त्यांनी अन्य ट्रॅव्हल्स च्या चालकाकडून नंबर मिळवला. त्यांना कॉल केला. दरम्यान, नर्मदा कार्तिक ट्रॅव्हल्स चे कर्मचारी ट्रॅव्हल्सची अंतर्गत सफाई करताना त्यांना ते पाकीट व कागदपत्र सापडले. त्यांनीही तत्काळ ट्रॅव्हल्सचे मालक अशोक कुचकोरवी व कार्यालयात ही माहिती दिली होती. मालकांनीही ते जपून ठेवण्याचा सल्ला दिला. इतक्यात धिरेंद्र घरड यांचाही चालकाला कॉल आला. आणि आपले पाकीट सुस्थितीत व्यवस्थित आहे, येऊन घेऊन जावा असा सल्ला दिला, त्यानंतर घरड समाधान वाटले. धीरेंद्र गरड यांना पैशापेक्षा पाकिटमध्ये असलेली कागदपत्र अत्यंत महत्त्वाची होती. ही कागदपत्र हरवली असती तर त्यांना सातत्याने कोल्हापूर अशा फेऱ्या मारावे लागणार होत्या. यात मानसिक त्रास व आर्थिक फटका ही सहन करावा लागला असता ,मात्र नर्मदा कार्तिकचे चालक व कर्मचारी यांनी हे पाकीट प्रामाणिकपणे परत दिल्यामुळे त्यांचा पुढील त्रास वाचला. महादेव कांबळे, शरीफ शेख, सचिन ठोर, पांडुरंग नरवडे , पिंटू यादव, आणि माधव (सर्व रा. लातूर) नर्मदा कार्तिक ट्रॅव्हल्स चे या चालक व कर्मचाऱ्यांनी हा प्रामाणिक जपला त्यांचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे आजही या नर्मदा कार्तिक खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये असे चालक-मालक व कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे कटिबद्ध आहेत, हेच या घटनेवरून दिसून आले. या घटनेनंतर नर्मदा कार्तिकच्या वर्षी मालक अशोक कोचकोरवी यांनी देखील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
|
…नर्मदा-कार्तिक ट्रॅव्हल्समध्ये अस काय घडलं की, सोशल मीडियावर व्हायरल होतंय! वाचा सविस्तर
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.














































































