तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
शिरोली:( रुपेश आठवले)-रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने तावडे हॅाटेल चौक येते दरवर्षी प्रमाणे यंदाही वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. रामदासजी आठवले यांचा वाढदिवस साजरा करताना उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली.
यावेळी गांधीनगर पोलीस स्टेशन चे API वाघ, पत्रकार संतोष माने, अनिल निगडे यांच्या प्रमुख उपस्थितीसह जिल्हा सचिव सतिश माळगे (दादा),प्रदीप ढाले,बाळासाहेब कांबळे,अमोल गवळी,गणेश भोसले,रोहित घोडके,अभिजीत रुकडीकर,अभिजीत कांबळे,सागर कांबळे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.*
पेठवडगाव येथे ही कार्यक्रम
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हातकणंगले तालुक्याच्या वतीने पेठवडगाव शहरांमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पेठवडगाव शहरांमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमात प्रवासी व वडगाव शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला युवा वर्ग यांना दूध वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला हातकणंगले तालुका अध्यक्ष अविनाश अंबपकर, ,जिल्हाध्यक्ष निर्मलाताई धनवडे ,सरचिटणीस दयानंद कांबळे ,उपाध्यक्ष अविनाश भोसले , कार्याध्यक्ष राजाराम कुरणे ,नागावचे शाखा सरचिटणीस विजय आठवले, न्यूज इंडियाचे जय कराडे व पक्षाची अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.