RPI चे तहसीलदार यांना निवेदन

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

हातकणंगले तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ हातकणंगले तहसीलदारांना निवेदन

शिरोली:(रुपेश आठवले) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) या पक्षातर्फे परभणी या ठिकाणी भारतीय संविधान प्रकृतीची विटंबना करणाऱ्या जातीवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेधाचे निवेदन हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना पक्षातर्फे देण्यात आले. या निवेदनात काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये भारतीय संविधान प्रकृतीची विटंबना करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच या प्रकरणी आंबेडकर अनुयायी यांच्यावर शासनाने बेकायदेशीर गुन्हे दाखल केले आहे. ते ताबडतोब मागे घेण्यात यावी .व सदर प्रकरणी जाणून बुजून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी सोमनाथ सूर्यवंशी यास पोलीस कोठडीत नेऊन मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबास सरकारने भरपाई म्हणून एक कोटी रुपये द्यावेत. पोलीस कोठडी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला .त्या पोलीस प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी.  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणतात की ज्या व्यक्तीने भारतीय संविधानाची विटंबना केली, तो मनोरुग्न होता ,असे म्हणत आहेत मग सदर मनोरुगणार व्यक्तीला भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना कशी करायची सुचली. याचा खुलासा महाराष्ट्र शासनाने करावा .त्या अनुषंगाने ज्या जातीयवादी व्यक्तीकडून भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली. त्या मागचे सूत्रधार कोण आहेत? याचा शोध तात्काळ शासनाकडून घेण्यात यावा व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा .अशी मागणीही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ( आठवले )तर्फे केली.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

वरील मागणीचा तत्काळ विचार झाला नाही तर महाराष्ट्रातील व देशातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने लाखोच्या संख्येने आंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी देण्यात आलाय.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.