देशी गाय, बैल, अश्व, श्वान, शेळी,बोकडांचे जंगी प्रदर्शन अन् स्पर्धाही
तब्बल ६९ लाखाची बक्षीसे, गाढवांचे देशातील पहिलेच प्रदर्शन कणेरी मठावर
कोल्हापूर – देशी प्रजातींच्या गाय ,म्हैशी,
पर्यावरण रक्षणाबरोबरच देशी प्रजातींच्या जनावरांचे संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतुने सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व राज्य सरकारच्या पशू संवर्धन विभागाच्या वतीने २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देशभरातून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गाढवांचे प्रदर्शन
अलीकडे अतिशय दुर्मिळ होत असलेल्या गाढवांचेही येथे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देशातील हे पहिलेच प्रदर्शन आहे. त्यांच्याही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. देशी प्रजाती दुर्मिळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे
शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी केली आहे. मठावर गोशाळा असून येथे हजारावर गायी आहेत. नुकतेच येथे भटक्या कुत्र्यांची शाळा सुरू करण्यात आली आहे. सुंमगलम् पंचभूत महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येणार आहेत. त्यामुळे देशी प्रजातींच्या जनावरांचे भव्य प्रदर्शन हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
तीन दिवस होणाऱ्या या प्रदर्शनात गाय ,म्हैशी, बकऱी, घोडे, गाढव
























