10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू
कोल्हापूर:परिक्षा सुरुळीत पार पाडव्या यासाठी आता राज्य शासनाच्या परिक्षा विभाग तसेच जिल्हाधिकारी विभागाने कंबर कसली आहे. विनाकारण कॉपी देऊन पाेरं पास हाेऊ नयेत, प्रामाणिक पाेरांचे नुकसान हाेऊ नये यासाठी विविध उपक्रमातून, जनजागृती तसेच वेळप्रसंगी कायद्याचा आधार घेऊन आता कॉपीमुक्त परिक्षा हाेण्यासाठी उपाययाेजना केली जात आहे. त्याचा एक भाग म्हणून नांदेड,लातूरच्या धर्तीवर आता कॉपीमुक्त परीक्षांसाठी परिक्षा आवारात चक्क १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामाणिक मुलांना, पालकांना दिलासा तर अभ्यास न करता काँपीचा आधार घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याची चपराक बसणार आहे. हे मात्र निश्चितच.
इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात/परिसरात दि. 21 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 या कालावधीत (ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 मधील कलम 144 अन्वये मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही, असेही कांबळे यांनी कळविले आहे.
शासनाचा स्त्तूत्य उपक्रम… असे केल्याशिवाय चुकीच्या पद्धतींना आळा बसणार नाही- POSITIVVE WATCH