CRIME- पाेलिसांची हँट्रीक; कामगिरी यशस्वी-रचला साफळा, ३८ लाखांची दारू सापडली! LCB वर काैतुकांचा वर्षाव

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कोल्हापूर: येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तिसरी यशस्वी कामगिरी करताना तब्बल 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .गोवा बनावटीची दारू मालाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकमालासह चौघां संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.चेतक भरत वाळवे, (रा. वाळवेवाडी, तालुका कणकवली )तुषार तुकाराम वाळवे, (रा. वाळवेवाडी -तालुका कणकवली) शहाबाद अब्दुल गोरे ,(रा. मुस्लिमवाडी तालुका- मानगाव, कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग) फारूक दस्तगीर जमादार,( रा. नाळे कॉलनी संभाजीनगर, कोल्हापूर) अशी संशयित ताब्यात घेतलेली आरोपींचीची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अधिवेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी रुपेश माने, वैभव जाधव, विनोद कांबळे, विनायक चौगुले विनोद कांबळे अमित सर्जे कृष्णात पिंगळे, महेश पाटील, गजानन गुरव, हंबीर अतिग्रे,अमित सर्जे यांनी ही यशस्वी कारवाई केली. गुन्हे अन्वेषण ला खबरी कडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री अवैध वाहतूक होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजले. त्यानंतर स्थानिक गुन्हे विभागाने रात्री सापळा रचला आणि तो यशस्वी झाला . सर्व वाहनांची तपासणी करत असताना आंबा घाटाकडून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी( क्रमांक एम.एच. 04-एफ एफ 9794 व आयशर टेम्पो (क्रमांक एम एच 07 एजे. 3513 अशी दोन वाहने येताना दिसली. प्रथमतः पोलीस चौकशीमध्ये वाहन चालकांची तपासणी व विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तर देत त्या मार्गावरून वाहने पुढे रेटून नेण्याचा जबरदस्तीने प्रयत्न केला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

 

आजच लाभ घ्या, गुंतवणूक करा

यावेळी पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी आपल्या स्टाईलने त्यांना अडथळा निर्माण केला असता आयशर टेम्पोमध्ये खाकी पुट्ट्याचे 500 बॉक्स भरलेले दिसून आले. त्यामध्ये गोवा बनावटीची रॉयल ब्ल्यू कंपनीच व्हिस्की दारू असलेल्या 180 मिलीच्या 48 सीलबंद बाटल्या आढळून आल्या हा सर्व माल बेकायदेशीर असल्याची पोलिसांची खात्री पटली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 लाख रुपये किमतीची ही गोवा बनवण्याची दारू असून दहा लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो व सुमारे चार लाख रुपये किमतीची शिफ्ट गाडी असा एकूण 38 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल असल्याचे पोलिसांनी सांगितले या सर्व बेकायदेशीर मालाची व गाड्यांची रीतसर कायदेशीर पंचनामा करून त्यांच्या विरोधात शावोळी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व संशयित आरोपींच्यावर याआधी देखील करवीर सावंतवाडी या ठिकाणी सन 23 व 24 मध्ये दारूबंदी कायदा कलमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल आहे.

 

कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या आठवड्यात तिसरी यशस्वी कामगिरी करताना 38 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोनच दिवसांपूर्वी याच विभागाने गांजा व कोकेनची विक्री करणाऱ्या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या या सातत्यपूर्ण होणाऱ्या कामगिरीबद्दल जनमानसात समाधानाची भावना असून,पोलिसांचे कौतुक केले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कर्तव्याचे काटेकोर पालन करा. गुन्हेगारी व अवैध वाहतूक रोखा, असे थेट आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आक्रमक झाला असून कारवाईसत्र सुरूच ठेवलेआहे। . या सलग झालेल्या तिसऱ्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रातील संशयित आरोपींचे व रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.

 

 

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.