टस्कर हत्तीचा बंदोबस्त न केल्यास आत्मदहन … हसणे ग्रामस्थांचा निर्णय पक्का..

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

टस्कर हत्तीचा दोन दिवसात बंदोबस्त न केल्यास हसणे ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहन 

माजी सरपंच सूर्यकांत सावंत व यशवंत कांबळे

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

राधानगरी तालुक्यातील हसणे येथे गेली पाच महिने वास्तव्यास असणारा टस्कर हत्तीचा येत्या दोन दिवसात बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा हसणे ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहन करू असा इशारा माजी सरपंच सूर्यकांत सावंत यशवंत कांबळे यांनी इशारा दिला आहे.
हसणे येथे गेली पाच महिने टस्कर हत्ती वास्तव्यास आहे. तस्कारांकडून हसणे तांब्याचे वडी हरिजन वाडा येथील ग्रामस्थांनी केलेली शेती पूर्ण उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना ठस्कर हत्तीमुळे मोठ्या धोका आहे. लाखो रुपयांची शेतीचे नुकसान होत आहे. या संदर्भात वन खात्याला अनेकदा निवेदना सुद्धा त्याकडे वनखाते दुर्लक्ष आहे. परिणामी,  ग्रामस्थांचे दिवसेंदिवस नुकसान होत आहे, याचे गांभिर्य वनविभागाला नसल्याचा  आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी माजी सरपंच सूर्यकांत सावंत, यशवंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाला शेवटचे पुन्हा एकदा निवेदन दिते आहे. तसेच दाजीपूर येथील वन्यजीव अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून गाऱ्हाणे मांडण्यात येणार आहे. जर का,  या संदर्भात सूचना देऊन सुद्धा त्याकडे जाणून बुजून वन्यजीव चे अधिकारी उपस्थित राहू शकले नसल्याने त्यांचा निषेध करण्यात आला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थांनी आक्रमक धोरण स्विकारत,  येत्या दोन दिवसात टस्कर हत्तीचा बंदोबस्त करावा. अन्यथा दाजीपूर वन्यजीव कार्यालसमोर ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहन करू असा इशारा वजा निवेदन राधानगरीचे प्रांताधिकारी व तहसीलदार वन्यजीव कार्यालय राधानगरी यांना देण्यात आलेआहे. त्यामुळे वनविभाग आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी  आंदोलनात माजी सरपंच सूर्यकांत सावंत ,यशवंत कांबळे ,विश्वास सावंत, तानाजी कांबळे, पंढरीनाथ पाटील, चंद्रकांत सावंत, मनोहर पाटील, गोविंद शिंदे, दत्तू गुरव, दिनेश ढेबे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. 

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.