|
तत्पूर्वी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करीत विद्यापीठ परिसरातून डॉ. आप्पासाहेब पवार चौकापर्यंत सहा नंबर प्रवेशद्वारामार्गे प्रभात फेरी काढली. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’, ‘स्वच्छता ही सेवा’ अशा अनेकविध घोषणा यावेळी दिल्या.
विद्यापीठात रुजलाय स्वच्छतेचा संस्कार
विद्यापीठामधील स्वच्छता मोहिमेदरम्यान प्लास्टीक कचऱ्याचे प्रमाण नगण्य आढळून आले. विद्यापीठात सर्वच घटकांत स्वच्छतेचा संस्कार रुजल्याची प्रचिती त्यातून आली. विद्यार्थ्यांसह अभ्यागत हे कचरा संकलनासाठी ठिकठिकाणी ठेवलेल्या कुंड्यांचा वापर करीत असल्याने आणि त्याची योग्य प्रकारे निर्गत केली जात असल्याने हे शक्य झाले. विद्यार्थ्यांसह सर्वच घटकांनी यापुढील काळातही आपला विद्यापीठ परिसर असाच स्वच्छ आणि विशेषतः प्लास्टीकमुक्त राहण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले.
|