….पत्रकारिता विद्यार्थ्यांची विद्यापीठात स्वच्छता

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात स्वच्छता मोहीम राबवली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने मंगळवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.
विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी अधिविभागाच्या परिसरात स्वच्छता केली. यावेळी वाढलेले गवत काढण्यात आले. सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा कचराही गोळा केला. विभागाच्या आसपास वाढलेली अनावश्यक झुडपे काढण्यात आली. त्यासोबतच इमारतीसमोरील गार्डनमध्येही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रा. डॉ. निशा पवार, डॉ. शिवाजी जाधव यांच्यासह बॅचलर ऑफ जर्नलिजम, मास्टर ऑफ जर्नलिझमचे विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.