विधानपरिषद शतकमहोत्सवानिमित्त ९६ वर्षीय ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांचा सत्कार…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सत्कारप्रसंगी १९७२ ते १९७८ या काळातील विधानपरिषदेतील अनेक महत्वाचे प्रसंग, आठवणींना उजाळा…

नागपूर – महाराष्ट्र विधानपरिषदेचे ९६ वर्षीय सर्वात ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांचा आज दिनांक २० डिसेंबर रोजी संध्याकाळी हृद्य सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र विधानपरिषदेला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ८ नोव्हेंबर, २०२३ आणि ८ डिसेंबर, २०२३ रोजी अनुक्रमे मुंबई आणि नागपूर येथे जो समारंभ झाला त्याला वयोमानामुळे ॲड. गोविंदराव आठवले, माजी विधानपरिषद सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

त्यांचे वय ९६ वर्ष आहे, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा यासाठी विधानपरिषदेच्या माननीय उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, उप सभापतींचे विशेष कार्य अधिकारी संतोष उडतेवार यांनी ॲड. गोविंदराव आठवले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा शाल, गौरवचिन्ह, विधानमंडळातर्फे प्रकाशित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ग्रंथाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी त्यांचे पुतणे अतुल आठवले आणि परिवारजन तसेच ते विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य असतांना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक उपस्थित होते.

सन १९७२ ते १९७८ याकाळात ॲड. गोविंदराव आठवले विदर्भ पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करीत होते. वयाच्या ९६ व्या वर्षी देखील ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांची स्मरणशक्ती आणि वाणी तीक्ष्ण असून त्यांनी या सत्कारप्रसंगी १९७२ ते १९७८ या काळातील विधानपरिषदेतील अनेक महत्वाचे प्रसंग, आठवणींना उजाळा देत सत्काराबद्दल आनंद आणि धन्यवादाची भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी दत्तोपंत ठेंगडी यांचे चरित्र कृतज्ञतापूर्वक माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांना सस्नेह भेट दिले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.