विजय बकरे
राधानगरी धरण 85 टक्के भरले येत्या मंगळवार पर्यंत धरण खुल्ले होणार…
राधानगरी प्रतिनिधी – राधानगरी धरण परिसरात एका दिवसात 211 मिलिमीटर पाऊस झाला व राधानगरी धरण 85% भरले असून येत्या दोन दिवसात धरणाचे दरवाजे खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आले.
राधानगरी धरण परिसरात गेली आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असल्याने राधानगरीधरण ८५% टक्के भरले असून परिसरात धरण परिसरात एकाच दिवशी 211 मिलिमीटर पाऊस झाला आहे तसेच राधानगरी धरणाची पातळी 340.50 फूट तर पाणीसाठा 70 83 पॉईंट 75 दशलक्ष घनफूट आहे एकूण पाऊस 1920 मिलिमीटर झाला आहे तसेच बीओटी मधून चौदाशे क्यू सेस पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण येत्या दोन दिवसात धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली.
तसेच आज पावसाचा जोर पश्चिम भागात जास्त असल्याने चित्र, पाहण्यास मिळत आहे दोन दिवसात धरण भरण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले.