कोल्हापूर: समाज कल्याण अंतर्गत असणाऱ्या शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जातात. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसित होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय निवासी शाळा गगनबावडा येथे करण्यात आले होते. या उपक्रमाचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले .
- स्पर्धेतील वैयक्तिक व सांघिक विजेते पुढील प्रमाणे –
खो खो लहान गट – शासकीय निवासी शाळा गगनबावडा विजेता व शासकीय निवासी शाळा राधानगरी उपविजेता.
खो खो मोठा गट- शासकीय निवासी शाळा मसूद माले विजेता व शासकीय निवासी शाळा शिरोळ उपविजेता
रस्सीखेच लहान गट – शासकीय निवासी शाळा मसूद माले विजेता व शासकीय निवासी शाळा गगनबावडा उपविजेता.
रस्सीखेच मोठा गट – शासकीय निवासी शाळा मसूद माले विजेता व शासकीय निवासी शाळा गगनबावडा उपविजेता.
रिले लहान गट – शासकीय निवासी शाळा राधानगरी विजेता व शासकीय निवासी शाळा गगनबावडा उपविजेता.
रिले मोठा गट- शासकीय निवासी शाळा मसूद माले विजेता व शासकीय निवासी शाळा राधानगरी उपविजेता.
वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विजेते पुढील प्रमाणे
लहान गट १०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक शर्वेश गोरख कांबळे, द्वितीय क्रमांक विनायक सुखदेव पुजारी व
तृतीय क्रमांक प्रतीक राहुल कांबळे
मोठा गट १०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक ऋत्विक अनिल कांबळे, द्वितीय क्रमांक शुभम बबन कांबळे
व तृतीय क्रमांक मंगेश परशू कांबळे.
लहान गट २०० मीटर धावणे-प्रथम क्रमांक शौनक शक्ती कांबळे, द्वितीय क्रमांक सुयश संजय जाधव व तृतीय क्रमांक गौतम मधुकर कांबळे.
मोठा गट २०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक सिद्धार्थ परशुराम खोपाळे, द्वितीय क्रमांक प्रेम रघुनाथ कांबळे व
तृतीय क्रमांक साहिल शहाजी कांबळे .
लहान गट ४०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक सुमित तानाजी लोहार, द्वितीय क्रमांक राजवीर कुमार भोसले तृतीय क्रमांक सुमित मधुकर कांबळे
कला व क्रीडा अविष्कार या उपक्रमाचे बक्षीस वितरण समारंभ उप आयुक्त जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर उमेश घुले, गटविकास अधिकारी गगनबावडा माधुरी परीट, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर दीपक घाटे, संशोधन अधिकारी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूर सचिन साळे यांचे उपस्थितीमध्ये संपन्न झाले. अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर विशाल लोंढे यांनी दिली
मोठा गट ४०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक रोहन सुरेश वाघमारे, द्वितीय क्रमांक रोहित परशराम ममदापुरे व तृतीय क्रमांक ऋतुराज अनिल कांबळे.
लहान गट थाळीफेक – प्रथम क्रमांक शंतनु हंकारे, द्वितीय क्रमांक शौनक कांबळे व तृतीय क्रमांक प्रज्वल जाधव
मोठा गट थाळीफेक – प्रथम क्रमांक सिद्धार्थ कांबळे, द्वितीय क्रमांक रोहित ममदापूरे व तृतीय क्रमांक प्रथमेश कांबळे.
लहान गट लांब उडी – प्रथम क्रमांक स्वरित कांबळे, द्वितीय क्रमांक श्रेयस कांबळे व तृतीय क्रमांक विश्वजीत कांबळे.
मोठा गट लांब उडी – प्रथम क्रमांक सिद्धार्थ कांबळे, द्वितीय क्रमांक ऋत्विक कांबळे व तृतीय क्रमांक संकल्प कांबळे.
भूमिका अभिनय स्पर्धा – प्रथम क्रमांक शासकीय निवासी शाळा शिरोळ, द्वितीय क्रमांक शासकीय निवासी शाळा मसूद माले व तृतीय क्रमांक शासकीय निवासी शाळा गगनबावडा .
लोकनृत्य स्पर्धा -प्रथम क्रमांक शासकीय निवासी शाळा राधानगरी, द्वितीय क्रमांक शासकीय निवासी शाळा शिरोळ व तृतीय क्रमांक शासकीय निवासी शाळा गगनबावडा
अशा उपक्रमातून शालेय स्तर उंचावण्याबराेबरच क्रीडा क्षेत्रात नावलाैकीक वाढण्यास मदत हाेते- POSITIVVE WATCH