२५ वर्ष सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा गौरव…!
मुंबई-खरतर ती आहे, म्हणून तूम्ही आहात, तुमचे स्वतःचे व तुमच्या गावाचे अस्तित्व आहे. जर ती च नसते तर तुमची ओळख कशी बर समजली असती. वर्षानुवर्षे ती तुमच्या अवतीभाेवती येतेय जातेय.. नजरेसमाेर. दर एक किलाेमीटरला दिसतेत. तिच्याच मुळे तर तुमचे करिअर घडले, शहराकडची वाट तुम्ही धरली.. तिच्याचमुळे तू माहेरवासिन, सासुरवासिन बनली. हाे. तीच तीच तुमच्या आमच्या गावातील शेवटच्या घरापर्यंत पाेहाेचणारी.. गावा गावात मुक्कामाला येणारी तसेच दूरवर हजाराे किलाेमीटर घेऊन जाणारी नि आणणारी. हाे ओळखलं असेलच. तुमच्या मनातली ह्दयात काेरलेली ती म्हणजेच लाडकी.. हक्काची. वाट पाहीन पण तिनेच जाईन व तेही सुरक्षितच. हाे हक्काची लाल परी.. आपली एस. टी. जी आजही स्पर्धेच्या युगात कितीही अडचणी आल्या तरी तुम्हाला नेतेय, आणतेय व जीवनाची दिशा देतेय. याच एसटीची आपण विशेष चर्चा करताेय. हाे. ही सेवा देणारी येथील असंख्य कर्मचारी, चालक वाहक अपार कष्ट घेऊन एस. टी. टिकावी. तिची विश्वासर्हता राहावी म्हणून आजही जीवाचे रान करताहेत. त्याच एस. टी. मधील तब्बल ७८० चालकांचा यथाेचिथ सत्कार करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळातर्फे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग २५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या ७८० चालकांचा सपत्नीक सत्कार केला जाणार आहे. हे या सत्काराचे वैशिष्ट आहे. त्यामुळे ते विनाअपघात करणारे आणि तेही तब्बल सलग २३ वर्षे डाेळ्यात तेल घालून हाती स्टेअरींग घेऊन जाणारे तुमच्या आमच्या विश्वासाला पात्र ठरलेले ते नशिबवान चालक काेण याचा उलघडा २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी हाेणार आहे. कितीही तणामुक्त असले किंवा नसले तरी आपला प्रवाशी हाच आपल्या जीवा भावाचा, त्यांना सुरक्षित घेऊन जाणे हीच खरी आपली जबाबदारी हीच सद्भाभावना ठेवून कर्तव्य बजावलेल्या तब्बाल 780 चालकांचा सत्कार हाेताेय हे एस.टी. प्रशासनाच्या सर्वच कर्मचााऱ्यांचा अभिमानाचा दिवस असणार आहे. त्याच दिवसाची उत्सुकता सर्वांना राहणार असून ते लकी 780 चालक काेण हे सत्कार झाल्यानंतरच कळणार आहे. त्यामुळे काेल्हापूरसह राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा व त्या चालकांचा आनंदाचा दिवस हा प्रजासत्ताक दिवस असेल.
ही बातमी देखिल अनेकांनी वाचली
अशा या सन्मामूर्ती चालकांचा सत्कार हा त्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख २५ हजाराचा धनादेश देऊन केला जाणार आहे. त्यांनी २५ वर्ष विना अपघात सेवा बजावल्याने ते सत्काराचे खरे शूरवीर असणार आहेत. राज्यभरात प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये विभाग नियंत्रक यांच्या हस्ते व मुख्यालयात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते या चालकांचा सत्कार आयोजीत करण्यात आला आहे.
सद्यस्थितीला एसटी महामंडळाकडे २४ हजार ३८९ चालक कार्यरत असून, अशा गौरव समारंभाच्या माध्यमातून विना अपघात सेवा करण्याऱ्या चालकांचा सत्कार हा इतर चालकांना प्रेरणादायी ठरावा आणि भविष्यात अपघात विरहीत सेवा देणाऱ्या चालकांची संख्या वाढून प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी सर्व चालकांनी घ्यावी अशी अपेक्षा मा.उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ते सत्कारमुर्ती नेमंके काेण याकडे संपूर्ण एस. टी. प्रशासनासह, प्रवाशी वर्गाचे लागून राहिले आहे.
सर्व एस. टी. चालकांचे पाँझिटीव्ह वाँच तर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा- एस. टी. प्रशासनाच्या सर्व उपक्रमासाेबत POSITIVVE WATCH नेहमीच साेबत