तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून जिल्ह्यात परिवर्तन घडवू – संदीप देसाई

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

आप च्या नवनियुक्त अध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्यात प्रदेश संघटनमंत्री संदीप देसाई यांचे प्रतिपादन…

कोल्हापूर – आम आदमी पार्टीच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, कोल्हापूर शहराध्यक्ष उत्तम पाटील व इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश सुतार यांचा पदग्रहण व सत्कार सोहळा शाहू स्मारक भवन येथे पार पडला. जिल्हाभर पक्षाचा विस्तार वेगाने व्हावा यासाठी तरुण नेतृत्वाला पक्षाने संधी दिली असे प्रतिपादन आप चे प्रदेश संघटन मंत्री संदीप देसाई यांनी केले.

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने जोमाने बांधणी सुरु केली असून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून पक्ष वाढवावा असे देसाई म्हणाले. निलेश रेडेकर, सुदर्शन कदम, संजय साळोखे, मोईन मोकाशी, उषा वडर, डो. उषा पाटील, पूजा अडदांडे उपस्थित होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.