WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा मिळवू – जयंत पाटील

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699याेग्य दरात याेग्य स्थितीतील , पूर्ण चालू कंडीशनमधील अटाेमँटीक वाँशिग मशीन विकणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा- 8380099974

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह महाराष्ट्रापुरते कायम राहिल यात शंका नाही.

पुणे – अन्य राज्यांमध्ये निवडणूका लढवून त्यात किमान चार टक्के मते मिळवणे व लोकप्रतिनिधी निवडून येणे हा जो नियम आहे त्यामध्ये थोडीशी कमतरता झाली असेल परंतु येत्या चार – सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा सहज आम्हाला मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह महाराष्ट्रापुरते कायम राहिल यात शंका नाही पण देशातील वेगवेगळ्या राज्यात आम्ही नागालँडमध्ये निवडणूका लढवल्या तिथे सात आमदार निवडून आले आहेत. लक्षद्वीपमध्ये आमचे खासदार आहेत परंतु तिथे विधानसभा नाही. त्यामुळे ते राज्य गृहीत धरले जात नाही हेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सर्व एजन्सीमार्फत जो वापर होतोय तो कोण व कसा करतेय त्याविषयी सतत भाष्य करण्याची आवश्यकता नाही कारण याबाबत सर्वांना माहित आहे. परंतु राष्ट्रीय पातळीवरील दर्जा जाण्याचे जी घटना घडली आहे त्यात आम्ही काही अटी पूर्ण करु शकत नाही त्या अटी आम्ही भविष्यकाळात पूर्ण करू असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ही घटना पक्षासाठी सेटबॅक आहे असे मला वाटत नाही कारण घड्याळ या चिन्हाचा महाराष्ट्रातील हक्क आमचा गेलेला नाही. त्यामुळे येत्या चार – सहा महिन्यानंतर हा दर्जा पुन्हा आम्हाला प्राप्त होईल. या निर्णयाने महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

काही पक्षांची काहीकाळ क्रेझ असते. ‘आप’ ने मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात व भारतातील काही राज्यात वेगवेगळी आश्वासन दिलेली आहेत. त्या आश्वासनावर काही ठिकाणी मतदान झाले आहे. राष्ट्रवादी जी जमेल तेवढीच आश्वासने देण्याची भूमिकेवर ठाम आहे. राज्य करण्याच्या ज्या काही पध्दती आहेत. त्यात विकासाचे मॉडेल आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा, सोयीसुविधा, शेतकरी शेतमजूर आणि मध्यमवर्गीयांसाठी सुधारणा ही आमची सतत व सातत्याने भूमिका राहिली आहे. त्यामुळे आम्ही कुठेही जाऊन जी शक्य नाही अशी आश्वासने देण्याच्या भानगडीत पक्ष पडला नाही. त्यामुळे काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त मते पडत असतील त्याबद्दल आमची तक्रार नाही परंतु आमचे धोरण सातत्याने या देशातील व महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक सुविधा निर्माण करताना हे समाजाभिमुख धोरण आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या तिजोरीचा वापर करून वारेमाप पैसे वाटणे आणि लोकांना खुश करणे ही भूमिका आमच्या सरकारने (जेव्हा जेव्हा सत्तेत होतो) आणि आमच्या पक्षाने केव्हाही घेतली नाही. आता ‘आप’ सर्व ठिकाणी जाऊन सगळ्याच घोषणा करत आहे त्यामुळे सर्वच गोष्टी मोफत द्यायची तयारी त्यांची असते. त्यांच्या आश्वासनांची लोकांना भुरळ पडते व लोक त्यांना फॉलो करतात. मतदानही करतात परंतु राज्याची आर्थिक व्यवस्था जेव्हा खिळखिळी होते त्यावेळी या मोफत गोष्टी शक्य होत नाहीत. याचा पंजाबमध्ये जनतेला अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यावर अनुभव यायला लागला आहे. त्यामुळेच अशी मोठी आश्वासने देणे याचा कधीतरी विचार झाला पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.

आमच्या पक्षाने प्रो भाजप भूमिका कधीच घेतलेली नाही. आणि अद्यापही घेतलेली नाही. कोणत्या विधानाचा भाजप सोयीस्कर अर्थ लावत असेल तर त्यासाठी आम्ही विधाने करतोय असे समजायचे कारण नाही असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले. अदानींचा विषय स्पष्ट आहे. लोकसभा आणि विधानसभेत पवारसाहेबांनी कित्येक वर्षे काढली आहेत. जेपीसीसमोर संख्या बळाचा निर्णय होतो ही साधी भूमिका मांडली आहे. अदानींची चौकशी व्हायला विरोध नाहीच आहे पवारसाहेबांनी तसे स्पष्टही केले आहे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली आहे त्यात चौकशी होणारच आहे. त्यामुळे अदानींच्या चौकशीला आमच्या पक्षातील लोकांनी विरोध केला नाही फक्त जेपीसीमुळे कितपत काही गोष्टी आपल्या हातात येतील याविषयी शंका असल्यामुळे पवारसाहेबांनी ते विधान केले होते असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सावरकर हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राला सावरकरांबद्दल जी भूमिका आहे तीच वेळोवेळी व्यक्त होते आहे त्यामुळे सावरकरांबद्दल आम्ही वेगळी भूमिका व्यक्त केली आहे असे आम्हाला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी सावरकर गौरव दिन साजरा केला. सावरकर दिनाबरोबरच अनेक प्रश्न राज्यात महत्त्वाचे आहेत. विशेषत: अयोध्येला मुख्यमंत्री गेले. आम्ही अवकाळीने सरकारचे लक्ष नाही म्हटल्यावर शिवारात जाऊन पाहणी करत आहेत. त्यामुळे या सरकारचे अशा मोठ्या घोषणा करुन यांचा गौरव, दिन त्यांचा गौरव दिन सुरू आहे मात्र जमीनीवर सामान्य माणसांच्या महागाईच्या विरोधात काही निर्णय नाही. अवकाळीने नुकसान झाले त्याबद्दल निर्णय नाही. यांच्या बाकीच्याच घोषणा जास्त आहेत. त्यामुळे या सरकारच्या प्रत्येक घोषणेविषयी शंका येत आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

आयपीएलवर पैसे कुणी उडवले, कधी उडवले. आयपीएल ही व्यवस्था निर्माण झाल्यावर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रिकेटपटूंना एक खेळण्याचे व्यासपीठ मिळाले आणि शेकडो खेळाडू आपली स्कील दाखवायला लागले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, निवृत्त झाले तर पुढे काय? याचे प्रश्नचिन्ह भारतात आता राहिले नाही. त्याचे श्रेय आयपीएल स्पर्धेला मिळते. क्रिकेटमध्येच नाही तर सर्वच खेळांमध्ये आयपीएल सध्या सुरु झाले आहे. त्यामुळे पैसे उडवण्याचा प्रश्नच येत नाही. या खेळातून पैसा मिळतो तो माजी सर्व खेळाडूंना कसोटीपटू, रणजीपटूंना मानधन दिले जाते. हे कधीच झाले नव्हते. ऐनभरात आलेला खेळाडू निवृत्त झाल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायचे परंतु अशा सर्व खेळाडूंची काळजी या आयपीएलमुळे निर्माण झालेल्या संपत्तीतून घेतली जात आहे. याचे कौतुक करायच्याऐवजी चुकीच्या टिका करणे हे थांबले पाहिजे आणि पवारसाहेबांनी जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागे शरद पवारसाहेब धावून गेले आहेत. हे विसरता येणार नाही हे जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी