महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त वीरमाता/वीरपिता/वीरपत्नी यांचा सत्कार…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप व पुस्तक देऊन सत्कार…

कोल्हापूर – महापालिकेच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने बुधवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

यामध्ये जवान निवृत्ती मरळे यांची सून ज्योति मरळे, जवान लक्ष्मण रावराणे यांची सून स्मिता रावराणे, जवान जयसिंग भोसले यांची पत्नी श्रीमती कांचनदेवी भोसले, कॅप्टन शंकर वालकर यांची वहिनी सौ. माणिक वालकर, जवान सुनिल चिले यांचे भाऊ अनिल चिले, मेजर मच्छिंद्र देसाई यांची पत्नी श्रीमती सुनिता देसाई, जवान दिगंबर उलपे यांची आई श्रीमती आनंदी उलपे, जवान अभिजीत सुर्यवंशी यांची आई श्रीमती मनिषा सुर्यवंशी, मेजर सत्यजित शिंदे यांचे भाऊ व्यंकोजी शिंदे या देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सेवा बजावित असताना शहीद झालेल्या स्टेशन ऑफिसर भगवान जाधव यांची पत्नी श्रीमती जाई जाधव, फायरमन श्रीकांत पाटील यांची पत्नी श्रीमती अंजनी पाटील, फायरमन दत्तात्रय खामकर यांचा भाऊ शिवाजी खामकर, फायरमन अशोक माने यांची बहिन भाग्यश्री डकरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, प्रशासनाधिकारी एस.के.यादव, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर नगररचना रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, सतीश फप्पे, रमेश कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक सुधाकर चल्लावाड, रवका अधिकारी प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, आस्थापना अधीक्षक राम काटकर, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, अग्निशमन दलाचे जवान, कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनी, व्यायामशाळा प्रशिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.