दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या चौकशीला हेतुपूर्वक दिरंगाई, ‘बचाव समिती’चे सोमवारपासून आमरण उपोषण…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

बँकेविरुध्द चौकशीला हेतुपूर्वक दिरंगाई करुन टाळाटाळ केली जात असल्याचे कारणावरून ‘बचाव समिती’चे येत्या सोमवारपासून आमरण उपोषण…

शिरपुर (प्रतिनिधी) – दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप. बँक लि. शिरपुर, जि. धुळे या बँकेच्या चौकशी संदर्भातील आपले कार्यालयीन पत्र जा क्रं. वि. १) मर्चंट बँक/ तक्रार अर्ज / सुनावणी सन 202३ अन्वये सुनावणी जाणीवपुर्वक टाळल्या बद्दल कंटाळून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी पत्र म.सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था शिरपुर, सहकार विभाग आणि जिल्हाधिकारींसह पोलिस प्रशासनाला दिले आहे. पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार, वरील संदर्भीय विषयानुसार १४/१२/२०२३ रोजी तिस-यांदा सुनावणी ठेवलेली होती. यापूर्वी पहिल्यांदा ३०/११/२०२३ रोजीचीच सुनावणी झाली. त्यानंतर आपले कार्यालयीन पत्रानुसार ८/१२/२०२३ रोजीच्या दुसया व १४/१२/२०२३ चौकशी अधिकारी म्हणून कार्य पाहायासाठी स्वत: हजर राहायला पाहिजे होते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

परंतु सुनावणीस लागोपाठ दुस-यांदा आपण चौकशी अधिकारी असतांना सुद्धा गैरहजर राहिले. तसेच ऐनवेळी आम्हांस दुसऱ्यांदा आपण स्वत: चौकशी अधिकारी असूनही सुनावणी स्थगित केल्याची माहिती आपले कनिष्ठ अधिकारी दुसाने यांनी दिली. याचाच स्पष्टपणे अर्थ असा दिसतो कि, अत्यंत नियमबाह्य व भ्रष्ट कारभार करणारे शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेचे अपात्र घोषित चेअरमन सह मॅनेजर, सर्व संचालक मंडळ, लोन ऑफिसर आणि संबंधित लोकांना संरक्षण देण्याचाच हा प्रकार आहे. सदरहू बँकेत मागील दोन महिन्यांपासून ठेवीदारांची भलीमोठी रांग लागलेली आहे. सुमारे एक महिन्यापासून चेक क्लियरिंग सुध्दा बंद आहे. सदरहू बँकेचे 2 एटीएम मशीन सुद्धा बंदच आहेत. म्हणजेच बँक डबघाईला आल्याचे एखादी डोळ्याने दिव्यांग असलेली व्यक्तीपण स्पष्टपणे सांगेल.

परंतु या जिल्ह्यातील सहकार विभागाने डोळेझाक करून वेळ मारुन नेण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविला आहे. यामुळे सहकार विभाग आणि या विभागातील अधिका-यांविषयी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे. एवढे गंभीर आर्थिक घोटाळे स्पष्टपणे दिसत असूनही चौकशीच्या नावाखाली फक्त दिरंगाई होत आहे. म्हणजेच चौकशीचा नावाने निव्वळ फार्स सुरु आहे असे दिसते. यांस प्रामुख्याने जबाबदार असणारे चौकशीअंती अपात्र ठरलेले चेअरमन प्रसन्न जयराज जैन यांसह मॅनेजर, संचालक मंडळ, लोन ऑफिसर आणि सर्व जबाबदार लाभार्थींची तात्काळ चौकशी करून कठोर कार्रवाई करण्याचे सोडून हेतुपूर्वक वेळकाढूपणा केला जात आहे. हे तक्रारदार ‘बँक बचाव समिती’च्या निदर्शनांस आले आहे.

चौकशी अधिकारी प्रभारी सहाय्यक उपनिबंधक म्हणून आपण श्री संजय गीते हे चौकशी करण्यास असमर्थ ठरले आहेत. म्हणून जिल्हा उपनिबंधकांनी ताबडतोब उद्या १५/१२/२०२३ रोजी सुनावणी होऊन आम्हांस न्याय द्यावा. सदरहू बँकेच्या सखोल चौकशीचे आदेश मा. सहकार आयुक्त सो, पुणे यांनी लेखी दिलेले असतांना सुध्दा जाणूनबुजून बुद्धिपुरस्कर या बँकेत कोट्यावधींचे आर्थिक गैरप्रकार करणा-यांना वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न होत आहेत. म्हणून तात्काळ उद्या १५/१२/२०२३ शुक्रवार रोजी सुनावणी ठेवून या बँकेच्या सर्व 14 संचालकांना अपात्र घोषित करून तक्रारदारांच्या इतर सर्व मुद्यांवर सुद्धा गांभीर्याने चौकशी करून लवकर कार्रवाई करावी ही नम्र विनंती. अन्यथा दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँक बचाव समितीचे आम्ही सर्व पदाधिकारी व सदस्य १८/१२/२०२३ सोमवारी सकाळी ११ वाजेपासून सहाय्यक उपनिबंधक, कार्यालय, शिरपुर, जि. धुळे समोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहोत.

यात होणा-या परिणामांस आणि आमच्या जीविताचे काहीही बरे-वाईट झाल्यांस दि शिरपुर मर्चंटस् को-ऑप बँकेचे संबंधित सर्व अधिकारी, जबाबदार व्यक्ति आणि शासन-प्रशासन सर्वस्वीपणे जबाबदार राहतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. असा इशारा ही या निवेदनाद्वारे बँक बचाव समिती ने दिला आहे. या निवेदनावर बँक बचाव समिती चे गोपाल के. मारवाड़ी, मोहन साहेबराव पाटील, ओंकार आबा जाधव, हिरालाल रामराव कोळी, डॉ सरोजताई पाटील, भरत बाजीराव रोकडे, शिवाजीराव हनुमंतराव बोरसे, योगेश देविसिंह पाटील (राजपूत), प्रमोद वसंतराव कलाल इत्यादींनी दिला आहे. ह्या पत्राची प्रत म.सहकार आयुक्त सो महाराष्ट्र राज्य पुणे, म.विभागीय सहनिबंधक सो। नाशिक, म.जिल्हाधिकारी सो।, धुळे, म.जिल्हा उपनिबंधक सो।, धुळे, म.जिल्हा पोलिस अधीक्षक सो।, धुळे, म.प्रांताधिकारी सो।, शिरपुर, म.उपविभागीय पोलिस अधिकारी सो।, शिरपुर, म.तहसीलदार सो।, शिरपुर आणि म.वरिष्ठ पोलिस निरीक्षक सो।, शिरपुर यांनाही पाठविले आहे.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.