| वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित “वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन” कृषी महोत्सवाच्या मंडप कामाचा शुभारंभ करण्यात आला.
वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची माहिती
”उत्कृष्ट पशुधन व पाककला स्पर्धे”च्या व महिला बचत गटांच्या स्टॉल नोंदणीची मागणी वाढली
या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहोळा ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
चिपळूण :— वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टसतर्फे दिनांक ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी चिपळूणमध्ये ”वाशिष्टी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन” २०२४ कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात दिनांक ६ रोजी ‘उत्कृष्ठ पशुधन तर दिनांक ७ रोजी पाककला स्पर्धा” होणार आहे. या दोन्ही स्पर्धेच्या नाव नोंदणीला तसेच महिला बचत गटांच्या स्टॉलला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती वाशिष्टी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या मे. वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्रकल्पाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा मार्ग मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना आणखी रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या पाहिजेत. या उद्देशाने वाशिष्टी डेअरी प्रकल्पातर्फे ५ ते ७ जानेवारी दरम्यान कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील महोत्सव चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या शेजारील चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत असणार आहे.
|
या स्पर्धेत सहभागासाठी नाव नोंदणी संपर्क- ९६३७६०५७५७/७७२२०४५०४८, ९४२२६६११९७
महिलांसाठी दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत पाककला स्पर्धा
|

|