WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये दोन महिलांवर मेदुच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, डॉ सागर जांभीलकर, डॉ. संदीप कदम व सहकाऱ्यांची कामगिरी…

कसबा बावडा – कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दोन महिलावर मेंदूच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या . डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, डॉ. सागर जांभीलकर, भूल तज्ञ डॉ.संदीप कदम, डॉ अमृता व सहकाऱ्यांनी या शस्त्रक्रिया केल्या. विशेष म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून या दोन्ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.

एका ५० वर्षीय महिलेची गेल्या ५ – ६ महिन्यापासून दृष्टी अंधुक होत असल्याची तक्रार होती. या महिलेने डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता डोळ्याच्या मागे ट्युमर असल्याचे निदान झाले. न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे व डॉ. सागर जांभीलकर यानी या महिलेच्या दोन्ही नसांवर मायक्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची होती. यामध्ये रूग्णाची वाचा जाण्याचा तसेच पक्षाघाताचा धोका होता. मात्र, हॉस्पिटलच्या टीमने तब्बल ६ तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून या महिलेची दृष्टी पूर्ववत करण्यात यश मिळवले.

अशाच एका ५५ वर्षीय महिलेला डोक्यात दुखण्याचा त्रास होत होता. कोणत्याही प्रकारच्या मार वैगरे बसलेला नसतानाही डोक्यातील तीव्र वेदनामुळे त्यांनी तपासणी करून घेतली. त्यांना अॅनुरीझम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनीला फुगा येऊन तो फुटल्याने रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. हा प्रकार पुन्हा होण्याचा शक्यता व त्यात रूग्णाच्या जीवाला धोका असतो. मात्र डॉ. घाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारून शस्त्रक्रिया करून क्लिपिंग करण्याचा निर्णय घेतला. मेंदूत रक्तस्त्राव सुरु असताना मेंदूच्या तळाशी जाऊन रक्तवाहिनीला क्लिप लावणे हे खूपच जोखमीचे होते. यामध्ये रक्तवाहिनी फुटण्याचा तसेच पॅरालेसीस होण्याचा धोका होता. मात्र तब्बल ८ तास ही गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया करत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेला पुनर्जन्मच दिला.

वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड म्हणाल्या, या दोन्ही शस्त्रक्रिया या वैद्यकीय कौशल्य पणाला लावणाऱ्या होत्या. मेंदूसारख्या नाजूक भगात रक्तप्रवाह नियंत्रणात ठेऊन, भुलेची योग्य प्रमाणात मात्रा देऊन आमच्या सहकाऱ्यांनी या अति जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. अत्यधुनिक सोयी सुविधा, तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्स व अचूक निदान यामुळे कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. न्युरोसर्जरी व मेंदूशी निगडीत अन्य शस्त्रक्रिया व उपचारही रुग्णालयात उपलब्ध आहेत.

यशस्वी उपचार करून अनेकांच्या जीवनात आनंद आणणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय तेथील डॉ. उदय घाटे, डॉ. सागर जांभीलकर, डॉ. संदीप कदम व सहकारी यांचे कौतुक होत आहे. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षका डॉ. वैशाली गायकवाड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.