मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा १२४ वा वार्षिकोत्सव मोठया दिमाखात साजरा
“आपला आतला आवाज ओळखा. खरी संपत्ती ही पुस्तकं आहेत बाकी सर्व फिजूल आहे.”…अंबरिश मिश्र
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणा-या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा १२४ वा वार्षिकोत्सव संस्थेच्या शारदा मंगल कार्यालयात मोठया दिमाखात साजरा झाला.ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अंबरिश मिश्र यांनी अध्यक्षीय भाषणात भारतीय विविध भाषांच्या शाब्दिक नाजाकती सांगत आणि त्याला आपल्या आईवडिलांच्या संसार’नाट्य’च्या आठवणी जोडून त्यांनी श्रोत्यांना खूप गुंतून ठेवले .
ते म्हणाले की “सर्वांनी बाकी काही नाही तरी चांगले नागरिक बना, पेटीतलं नाणं नको, आपल्या मातीची ओढ जपा , धर्म व जातिपातीच्या पलीकडे पाहा. आज आलेल्या एकूण स्थितीचा त्यांनी तीव्र शब्दात निषेधही नोंदवला . आपला आतला आवाज ओळखा. खरी संपत्ती ही पुस्तकं आहेत बाकी सर्व फिजूल आहे. “आपल्या भाषणात डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी अंबरीष यांच्या भाषणात आलेल्या सर्व मुद्दयांचे कौतुक केले आणि ग्रंथांचं महत्त्व व संस्थेचे मोठेपण विशद केले. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या वतीने रिझर्व्ह बँकेचे संचालक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की हे ग्रंथालय म्हणजे ज्ञानमंदिर आहे.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर,विश्वस्त प्रताप आसबे, अरविंद ताम्बोळी, प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे,कार्यवाह उमा नाबर,कार्योपाध्यक्ष मारूती नांदविस्कर, कोषाध्यक्ष प्रदिप ओगले,जयवंत गोलतकर आणि कार्यकारी मंड्ळ सदस्य त्याच बरोबर आजी-माजी सेवक मोठया संखेने उपस्थितहोते. मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. याप्रसंगी वार्षिकोत्सवाचे अध्यक्षानी प्रथम संस्थेचा मानबिंदू मानला जाणा-या संदर्भ विभागास भेट दिली.तेथिल ग्रंथसंपदा व अभ्यासकांना दिल्या जाणा-या तत्पर सेवेबद्दल समाधान व्यक्त केले व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. या वार्षिकोत्सवात संस्थेच्या प्रथेप्रमाने अंबरीष मिश्र याना संस्थेचे सन्माननीय आजीव सभासदत्व बहाल करण्यात आले. सांस्कृतिक कार्य करणा-या शाखेस फिरती ढाल दिली जाते.त्याचा मान या वर्षी संस्थेच्या मुलुंड विभागास मिळाला.तसेच बिनचूक हिशोब ठेवणा-या शाखेस दिले जाते या वर्षीचा हा मान संस्थेच्या गोरेगाव पुर्व विभागास मिळला आहे. तसेच यावेळी अध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर,अरविंद ताम्बोळी यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले.
नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत नटवर्य केशवराव दाते पारितोषिक – विजेते – संदेश बेंद्रे नटवर्य मामा पेंडसे पारितोषिक विजेते नाटककार – श्वेता पेंडसे, अभिनेता – प्रदिप कबरे कवी प्रफुल्ल्दत्त पारितोषिक विजेते – १. डॉ.अर्जुन होन – आदर्श शिक्षक २. विलास देवळेकर – उदयोन्मुख उत्तम कवी. डॉ.वि.गो.खोबरेकर स्मृति पारितोषिक विजेते – डॉ.आशुतोष रारावीकर कै.प्रा.धो.वि.देशापांडे स्मृति पारितोषिक विजेते – १. डॉ.राजीव नाईक ग्रंथ – ” लागलेली नाटकं ” २.श्री.राकेश वानखेडे ग्रंथ – ” हिंदू :२१ व्या शतकातील सामाजिक समस्या ” डॉ.भालचंद्र नेमाडे यांच्या ” हिंदू ” कादंबरीची चिकित्सा. सुलभा व गणेश फाटक यांच्या स्मरणार्थ ग्रंथपालन वर्ग गुणवंत विद्यार्थी पारितोषिक विजेते – नंदिनी पाटील,सुनिता फर्नांडिस,श्रीकांत जाधव, मरियम चेट्टियार. कै.प्रा.वि.ह.कुळकर्णी स्मृति पारितोषिक विजेते -१.चरित्र ग्रंथ ” बहुरुपीणी दुर्गा भागवत ” – अंजली किर्तने, मुंबई आणि २.आत्मचरित्र ” मनासी संवाद आपुलाची वाद आपणांसी ” – अनिरुद्ध जाधव,लातुर व ३.चरित्र ग्रंथ ” गांधी पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा ” – रावसाहेब कसबे. |
प्रा.रा.को.फाटक / रामचंद्र डिंगे / कै.जयश्री पावसकर /कै.चंद्रिका नाडकर्णी / कै.रंगनाथ एरंडे उत्कृटसेवक पारितोषिक विजेते – संजय गावकर, मेघना आघरकर, शमा हिरे, रोहिनी पवार, नंदा खैरमोडे, उमा मेस्त्री, तृप्ती गोडकर,मंगल सकपाळ,गायत्री राक्षे, प्रतिभा पोशे, वैजयंती आचरेकर, मनिषा बेटकर, सुनिता जेधे, अलका वगळ,मिताली तरळ,अर्चना पाटील, संध्या पाटील, लिला हिरे, अक्षता राणे, संगीता माधव अश्विनी माने,बबन कर्जावकर कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख कार्यवाहानी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या सभासदांचे,हितचिंतकांचे आभार मानले.