महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख, कोल्हापूरच्या संस्था कोणत्या वाचा सविस्तर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने 

कोल्हापूर जिल्ह्यातील ८ संस्थांचे नामकरण

कोल्हापूर : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वी पणे करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ८ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

नामकरण केलेल्या संस्थांची माहीती पुढील प्रमाणे

१. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, जि. कोल्हापूर- राजर्षी छत्रपती शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर, जि. कोल्हापूर

२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पन्हाळा, जि. कोल्हापूर- शिवा काशिद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पन्हाळा, जि. कोल्हापूर

३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर- सरसेनापती प्रतापराव गुजर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज, जि. कोल्हापूर

४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरगूड, जि. कोल्हापूर- सेनापती संताजी घोरपडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुरगूड, जि. कोल्हापूर

५. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हातकणंगले, जि. कोल्हापूर- वीर धनाजी जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हातकणंगले, जि. कोल्हापूर

६. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाहूवाडी, जि. कोल्हापूर- बाजी प्रभु देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शाहूवाडी, जि. कोल्हापूर

७. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आजरा, जि. कोल्हापूर- शिवाजी सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आजरा, जि. कोल्हापूर

८. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुदरगड (गारगोटी), जि. कोल्हापूर- हुतात्मा नारायण वारके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुदरगड (गारगोटी), जि. कोल्हापूर

या बाबत मंत्री लोढा म्हणाले “औद्योगिक संस्थांचे नामकरण हा केवळ एक निर्णय नसून, महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या संस्थांना आदर्श नेतृत्वांच्या नावाने ओळख मिळाल्याने या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची शिकवण व प्रेरणा मिळेल. युवकांचा कौशल्यविकास हे राज्याच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे, आणि या नावांमुळे प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आपल्या कार्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव होईल. हा उपक्रम नव्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी प्रेरणा देईल आणि त्यांच्या मेहनतीला एक दिशा देईल.”

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.