कळंबा जेलमध्ये कैद्यांच्या मारामारीत एकाचा मृत्यू
कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा कारागृहात दोन कैद्यांमध्ये झालेल्या मारामारी एकाचा मृत्यू झाला. सतपालसिंह जोगेंद्रसिंह कोठडा असे मयत कैद्याचे नाव असून या घटनेनंतर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मोका कारवाईत अटकेत असलेल्या कैद्याने कळंबा कारागृहात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. भरत घसघसे कैद्याने आत्महत्या केली होती. त्याने खिडकीला कापडाची पट्टी बांधून आत्महत्या केली होती. जेलमध्येच कैद्यांचे खून, मारामारी, मोबाईल सापडणे, जेल अधिकाऱ्यांवर सहकारी महिलेवर अत्याचाराचे आरोपांमुळे एकंदरीत कळंबा जेलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात कळंबा जेलमध्ये कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीत एका कैद्याचा मृत्यू झाला होता. निशिकांत कांबळेचा मारहाणीत मृत्यू झाला होता. निशिकांत आणि इतर चार कैद्यांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर हाणामारी झाली. याच हाणामारीत बेदम मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या चार कैद्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शनिवारी मध्यरात्री ही असाच प्रकार कळंबा कारागृहात घडला, दोन कायद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत सतपालसिंह जोगेंद्रसिंह कोठडा या बंदी जणांचा मृत्यू झाल्याने कळंबा कारागृह परिसरात खळबळ उडाली आहे.