शाहुपूरी हद्दीत तलवार वार… पाेलिसांनी शिताफीने पाचजणांना केले गजाआड; धुमसत्या तरुण गुंडागर्दीला आवर घालण्याचे पाेलिसांपुढे आवाहन

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

कोल्हापुरात तलवार हल्ला! गब्बर आणि साथीदारांचा पाेलिसांनी घेतला समाचार – पाच जण अटकेत, दोन फरार

कोल्हापूर: शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळक्यांची आक्रमकता समोर आली आहे. कावळा नाका परिसरात राहणाऱ्या श्रीधर कुचकोरवी या तरुणावर शनिवारी सायंकाळी तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांना अटक, तर तेजस जगताप आणि तुषार कुमठे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

श्रीनाथ गंगाराम कुचकोरवी शनिवारी दुपारी आपल्या मित्रासोबत विवेकानंद कॉलेजजवळील एका हॉटेलमध्ये गेला होता. हॉटेलबाहेर उभा असताना तेजस जगताप नावाच्या युवकाने त्याला शिवीगाळ केली. श्रीधरने वाद न घालता संयमाने घर गाठले. मात्र, याच शिवीगाळीचा बदला घेण्यासाठी सायंकाळी आदित्य उर्फ ‘गब्बर’ सूर्यवंशी आणि त्याच्या टोळीतील पाचजणांनी आदित्य कॉर्नर परिसरात श्रीधरवर हल्ला चढवला. गब्बरने थेट तलवार काढून श्रीधरवर सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले.

जखमी अवस्थेमधील श्रीनाथ काेरवी.

या घटनेनंतर श्रीधरने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रात्री उशिरा आदित्य सूर्यवंशी (गब्बर), अनिकेत सूर्यवंशी, सुजल ढेरे, ओंकार समुद्रे आणि प्रतीक नागावकर यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्वांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

दरम्यान, या हल्ल्यामागे पूर्वीचा वाद व स्थानिक दहशत माजवण्याचा उद्देश असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हल्ल्यानंतर तेजस जगताप आणि तुषार कुमठे हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी काही ठिकाणी छापे टाकले असून लवकरच उर्वरित आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

POSITIVEWATCH MEDIA- YOUTH ASSOCIATION

“तणावातून मार्ग हिंसामार्ग नाही, तर संवाद आणि संयम हा खरा शौर्याचा मार्ग असतो.”

– समाजात बदल घडवायचा असेल, तर रस्त्यावर तलवार नको – विचारांची धार असू द्या!

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.