Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375
भव्य निषेध बाईक रॅली
“”शक्तीऋतुजा””
सांगली येथे ख्रिश्चन धर्मांतरासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून “ऋतुजा” नावाच्या हिंदू मुलीने आत्महत्या केली या प्रकरणात सुरुवातीपासून मुलीची फसवणूक करण्यात आली. लग्नाच्या वेळेस एका ख्रिश्चन कुटुंबाने आम्ही हिंदू आहोत असं भासवून मुलीच्या घरातील लोकांना फसवले आणि लग्न उरकून घेतले. यानंतर मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली मुलगी जेव्हा सात महिन्याची गर्भवती होती त्यावेळेस तिला चर्चमध्ये नेऊन ख्रिश्चन पद्धतीने पूजाअर्चा करायला लावली. घरात देखील त्याच प्रार्थनेचा आग्रह धरला. एक हिंदू मुलगी जी हिंदू संस्कृतीत वाढलेली आहे, जिला हिंदू सण उत्सव आनंदात करण्याची सवय आहे अशा मुलीवर अचानक होत असलेल्या असल्या आघातामुळे या मुलीने कंटाळून शेवटी आत्महत्येचा निर्णय घेतला. या आपल्या बहिणीला न्याय द्यायला कोल्हापूरकरानी एकत्र यायचं आहे.
हे एकच प्रकरण एकच नाही. अशी अनेक प्रकरणे आज देशात व महाराष्ट्रात घडत आहेत. म्हणून धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर मंजूर व्हावा आणि तो कायदा अतिशय कडक असावा या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये जबरी आणि फसवून होणाऱ्या धर्मांतराचा निषेध करण्यासाठी बाईक रॅलीचे आयोजन केलेले आहे.
सोमवार दिनांक २३ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राजारामपुरी “आईचा पुतळा” येथून या बाईक रॅलीला सुरुवात होईल आणि या बाईक रॅलीचा शेवट हा जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे होईल. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले जाईल.
यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याचे हिंदुत्ववादी आमदार श्री महेशदादा लांडगे उपस्थित राहणार आहेत.
- हे निषेध आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या भावनांचे असल्याने वैयक्तिक निमंत्रणाची वाट न पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटना व सर्वसामान्य हिंदू बंधू-भगिनींनी ऋतुजाला न्याय मिळावा यासाठी या बाईक रॅलीत सहभागी व्हावे.
“”शक्ती ऋतुजा आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
|
Post Views: 498