WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

त्याच हे अस कसं ‘बेधुंद’ प्रेम ; शेवट काय तर 19 ला समजणार..!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

बेधुंद व्हायची प्रतीक्षा संपली; १९ मे रोजी ‘दिल बेधुंद’ प्रदर्शित

कोल्हापूर – प्रेमकथा म्हटलं की साधारणपणे प्रेक्षकांच्या मनात त्या चित्रपटाचं एक कथानक, नायक-नायिका, भावना उचंबळून आणणारं संगीत आणि अत्यंत ‘प्रेमळ’ वाटणारे संवाद असा सगळा मसाला आधीच तयार होतो. मग प्रेक्षक हा सगळा मसाला डोक्यात घेऊन चित्रपटगृहात जातात. ‘अरे हे तर आधीच माहिती होतं’, असं म्हणतात आणि परत येतात! प्रेमकथेवर आधारित तयार होणारे त्याच त्याच धाटणीचे चित्रपटही त्याला काही अंशी कारणीभूत असतात. पण अर्थात, सगळेच चित्रपट असे एकाच मुशीतून काढलेले नसतात बरं! अशीच एका वेगळ्या मुशीतली प्रेमकथा प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी ‘दिल बेधुंद’ सज्ज झालाय!

आधी टायटल आणि नंतर पोस्टर लाँचला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘दिल बेधुंद’चा ट्रेलरही त्याच उत्साहात लाँच झाला. या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर तो व्हायरल होऊ लागला आहे. खरंतर टायटल लाँच झालं, तेव्हाच इथे काहीतरी वेगळं आणि अर्थात बेधुंद करणारं असेल, असा कयास बांधला गेला होताच. चित्रपटाचं पोस्टर आलं तेव्हा आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारा हंसराज जगताप आणि नवोदित अभिनेत्री साक्षी चौधरी यांची जोडी सर्वांसमोर आली. पोस्टरवरून त्यांची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार यावर जणू शिक्कामोर्तबच झालं.

चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा हंसराज जगताप याची वेगळी ओळख मराठी प्रेक्षकांना करून देण्याची गरजच नाही. ‘धग’मधल्या त्याच्या अभिनयाला स्पेशल ज्युरी नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्यामुळे मराठी जनमाणसात तो सहज जाऊन पोहोचला. पण त्याच्यासोबत चित्रपटाची अभिनेत्री अर्थात साक्षी चौधरीही ट्रेलरमध्ये दिसत आहे. वयानं हंसराजपेक्षा काहीशी मोठी दिसणारी साक्षी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असली, तरी त्यांच्यात चित्रपटात नेमकी कशी केमिस्ट्री दिसणार आहे, याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे. या दोघांसमवेत जयेश चव्हाण, आरती कुथे, नितीन पात्रीकर, प्रदीप रोंगे, संयोनी मिश्रा, धीरज तरुणे आणि गोविंद चौरसिया यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत.

१९ मे रोजी हा चित्रपट दिमाखात महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. ओशियन कर्व्हज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे निर्माते शिवम पाटील आहेत. संतोष फुंडे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून गुड्डू देवांगन यांनी कथा लिहिली आहे. पवन रेड्डी चित्रपटाचे डीओपी आहेत. चित्रपटाचं संगीत स्वप्नील शिवणकर यांचं असून गाणी के. स्वामी यांनी लिहिली आहेत. चित्रपटाच्या पब्लिसिटी डिझाईनची जबाबदारी श्री. मुसळे यांनी पार पाडली आहे. रवी पाटील आणि सुयश जाधव यांनी चित्रपटाचं संकलन केलं असून अभिजित कुलकर्णी व विष्णू घोरपडे यांनी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.