वाहनांच्या ताफ्यासह मुख्यमंत्री के. सी. आर. यांनी घेतलं श्री अंबाबाईचे दर्शन…
कोल्हापूर – तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे आज कोल्हापूर सांगली दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने के चंद्रशेखर राव यांनी शहरातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत करवीर निवासिनी श्री अंबाबाई चें दर्शन घेतले. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
![]() |
![]() |
![]() |
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून कोल्हापूर आणि सांगली असा त्यांचा दौरा आहे. गेल्या काही दिवसापासून ते वारंवार महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. केसीआर यांना महाराष्ट्रात इतका रस का अशी चर्चादेखील रंगू लागलीय काही दिवसापूर्वी केसीआर यांनी सोलापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत गुलाबी वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यामुळे त्यांच्या राजकीय वर्तुळाची चांगली चर्चा रंगली आहे.
आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या सर्व आमदार खासदार आणि मंत्री मंडळाच्या सहकाऱ्यांच्या वाहनांच्या ताफ्यासह कोल्हापूर शहरातून शक्ती प्रदर्शन केलं. एका विशेष बस मध्ये बसलेल्या के चंद्रशेखर राव यांना आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी लोकांनी देखील गर्दी केली. करवीर निवासिनी श्री श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन ते सांगलीतील वाटेगाव इथं कार्यक्रमासाठी रवाना झाले.