पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाण्याला बदली
कोल्हापूर : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी नांदेडचे नागरी संरक्षण हक्क पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
महेंद्र पंडित यांनी मे 2023 मध्ये कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदाची धुरा स्वीकारली होती. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावली. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून त्यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत एक नवा मापदंड निर्माण केला. अनेक गुन्ह्यांची उकल करत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची ठसठशीत छाप सोडली.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
निवडणुका, मोर्चे, आंदोलने अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रसंगांमध्ये त्यांनी प्रशासकीय संयम आणि काटेकोर नियोजनाच्या आधारे जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखली. नवीन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्याकडूनही जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.










































































