ELECTION- बेताल वक्तव्य…update इकडचे तिकडचे!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

निवडणूक प्रचार सुरू झाला व बेताल वक्तव्य ही सुरू झाली. आज   सदाभाऊ खोत यांनी सर्व मर्यादा सोडून खालच्या पातळीवर जाऊन पवारसाहेबांवर टीका केली.व्यासपीठावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांसह इतर मान्यवर हसत होते. हे दृष्य चीड आणणारे होतेच त्याचबरोबर काय लायकीचे राजकारण झाले आहे तेही दाखवणारे होते. पवारांना नववा महिना लागला आहे कळा सुटल्या आहेत त्याला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय म्हणजे तुझ्या चेह-यासारखा करायचाय काय? माझ्या चिल्यापिल्यांच कस व्हायच. तुझ्या चिल्यापिल्यांनी साखर कारखान खाल्ल, संस्था सुत गिरण्या खाल्या.  सगळ हाणल तरी चेहरा बदलायचय म्हणतय. अजित पवारांनी नंतर सदाभाऊंना यावरून तंबी दिली. हे आम्हाला अमान्य. हे वक्तव्य चुकीच व निंदनीय. यापुढ खालच्या पातळीवरील टीका खपवून घेणार नाही. सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या चिन्हावर 13ता.स अंतिम निकाल व तोपर्यंत घड्याळ चिन्ह वापरताना प्रकरण न्यायप्रविष्ट आसल्याचे जाहीर करणे बंधनकारक केले आहे.

बंडखोरांच नाटक जवळपास संपुष्टात आले आहे. कुणाला काय मिळाल तर कुणाला धमक्या मिळाल्या सार काही इतिहास जमा होऊन महाराष्ट्र कालपासूनच सुरू झालेल्या बेताल आरोप, घमंडखोर घोषणाबाजी, उणीदुणी काढणे या प्रचारात  वहावत जाईल. जरांगे पाटलांची चिंता काहीशी संपली असल्याने ब-याच उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल. ‘काहीशी ‘ म्हणजे त्यांचा गनिमी कावा आणि ‘पाडापाडी ‘ बाकी आहे. महाराष्ट्रातील ‘ट्रेडिंग’ राजकारणाचा सूर त्यांनी अचूक पकडलेला दिसतोय. समाजकारणावर राजकारण नेहमीच कुरघोडी करत आलेले आहे. राहूल गांधींचा ‘मेन मेडीया’वरचा विश्वास केव्हाच उडाला आहे त्यांनी गेले अनेक वर्षे हे सभांमधून आणि प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्स मधेही बोलून दाखवणे सुरू केले होते त्याचेच प्रत्यंतर त्यांच्या नागपूर मधिल संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने येत आहे. 200 पेक्षा जास्त ओबीसी, दलित संघटनंचा सहभाग असलेल्या या संमेलनात मेन मेडीया-वृत्तपत्र, ईलेक्ट्राॅनिक चॅनल्स आमंत्रित नाहीत त्याऐवजी सोशल मेडीया वर ‘लाईव्ह कव्हरेज ‘असल्याचे व त्यावर भाजप ने टीकेची झोड उठवल्याचे वृत्त आहे. त्यातील तथ्य आजच दिसेल .पवारसाहेबांची निवृत्तीची गुगली सहानुभुती मिळवून देणार. 2009 साली झालेल्या निवडणुकीत कै. सदाशिवराव मंडलिक यांचा त्यांच्याशी झालेला संग्राम ब-याच जणांच्या स्मरणात असेल. किंवा कै. वसंतदादा पाटील यांच्याबाबतीत त्यांनी काय केले ते महाराष्ट्राला ठाऊक असले तरी, घरात राजकीय फुट पडली, पक्ष फुटला तरी, मताची टक्केवारी घसरली तरी वयाची पर्वा न करता सातत्याने भविष्यावर नजर ठेवून ते करत असलेल काम हे सार महाराष्ट्राला विसरायला लावतय काय? नवाब मलिक यांच्यावर टीका करून त्यांना तिकिट नाकारणा-या भाजपने नवाब मलिक यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून केव्हाच मुक्त केले आहे. किती विसंगती निर्माण झाल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात!

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात महाराष्ट्र रोजगारात अव्वल विरोधी पक्ष म्हणतात उद्योगधंदे चालले गुजरातला. पवारसाहेब तर म्हणतात मोदीजी एकाच राज्याचे पंतप्रधान का? उद्धव ठाकरे म्हणतात निवडून आलो तर सुरतेत छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा उभारू फडणवीस म्हणतात 22वर्षापुर्वीच मोदीजींनी उभारलाय. कोल्हापूर मधे लाटकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज काही मागे घेतला नाही. नाना पटोले यांनी त्यांनाच काँग्रेसचा पाठिंबा राहील असे जाहीर केले.

 

शाहूमहाराज म्हणतात एका घरात दोन पदे नको म्हणून आम्ही अर्ज मागे घेतला तर सतेज पाटील म्हणतात मला तोंडघशी का पाडले! आणि संभाजीराजेंनी तिसरी आघाडी उघडलीय. जरांगे पाटील यांच्या ‘फोडा फोडी ‘वर वंचितच्या रेखा ठाकूर म्हणतात दाऊद ला पाठींबा देणा-या उमेदवारांना जरांगे पाटील पाडणार काय!महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांना वर्षाला रू 15000 मिळणार  व जीवनावश्यक वस्तुंच्या किमती स्थिर ठेवणार असे जाहीर केले आहे.

बहुतांशी पक्ष निवडणूक प्रचाराचा प्रारंभ कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन करतात व नंतर कोल्हापूरलाच वंचित ठेवतात.  ‘सांगली पॅटर्न’ चे बॅनर्स पुण्यात लागतात पण कोल्हापूरात मात्र नाहीत. संजय राऊत फडणवीसांच्या जातीवर घसरले. फडणवीस म्हणतात राहूल गांधी डाव्या विचारसरणीचे! एकनाथ शिंदे 12 दिवसात रोज 4 प्रमाणे 48  सभा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढणार. राष्ट्रवादीच्या चिन्हाविषयी सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार काय

ठाकरे कुटुंबीयांची पुढची पिढी एकत्र येण्याचे संकेत – राज ठाकरे पुत्र अमित ठाकरे दादर-माहिम मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याच्या शक्यतेच्या बातम्या येत आहेत. त्याहून पुढचे पाऊल म्हणजे अमित ठाकरे निवडणूकीत उतरले तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून  उमेदवार द्यायचा नाही असे चालले आहे. मग कदाचित आदित्य ठाकरेंना ही मनसे कडून  विरोध होणार नाही. नांदेड चे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजप ला रामराम केला. सिंदखेडराजाचे अजितदादा गटाचे आमदार व माजी मंत्री राजेंद्र शिंगणे शरद पवार गटात प्रवेश करणार. हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातो आहे.

असेच इकडचे तिकडचे अपडेट वाचण्यासाठी अँलर्ट रहा… पाँझिटीव्ह वाँच पहात रहा…

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.