सोनवडेत चटकदार कुस्त्यात कुमार पाटील ने मैदान मारले
शिराळा (जी.जी.पाटील)
सोनवडे ता.शिराळा येथे संत सतुबुआ भंडार्यानिम्मीत्त आयोजीत करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी पै कुमार पाटील शित्तुर (मोतीबाग तालीम कोल्हापूर) विरीध्द पै अक्षय ब्राह्मणे (पुणे) यांच्यात झालेल्या प्रेक्ष9णीय कुस्तीत पै.कुमार पाटील याने अक्षय ब्राम्हणे यास अवघ्या दहाव्या मिनिटाला गदालोट डावावर चितपट करुन उपस्थित कुस्तीशौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
दुसर्या क्रमांकासाठी पै सुरज पाटील (शित्तुर) विरुध्द इंद्रजित मुळे (गंगावेश) यांच्यात झालेल्या कुस्ती लढतीत पै.सुरज पाटील याने बॅक थ्रो डावावर पै.इंद्रजीत मुळे यास आस्मान दाखवुन उपस्थितांची वाहवा मिळवली
तिसर्या क्रमांकासाठी पै दत्ता बाणकर, मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी विरुध्द पै नवीन कुमार, हांडे पाटील तालीम सांगली यांच्यात झालेल्या अतितटीच्या लढतीत दत्ता बानकर याने पोकळ घिस्सा या डावावर विजय मिळवुन उपस्थितांची वाहवा मिळवली.मैदानात शंभरावर चटकदार कुस्त्या झाल्या.
चौथ्या क्रमांकासाठी पै प्रथमेश गुरव, वारणा आणि पै सुमित भोसले, शाहुपुरी यांच्यात झालेल्या कुस्तीत पै.प्रथमेश गुरव याने एकछाक डावावर विजय मिळवला
पाचव्या क्रमांकासाठी पै ओंकार जाधव, मल्लविद्या व पै कर्तार कांबळे, पेरीड यांच्यातील कुस्तीमध्ये झालेली कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे उदघाटन – सोनवडेचे माजी सरपंच व विश्वासचे माजी संचालक – शामराव नाईक,उपसरपंच- सर्जेराव पाटील,युवराज नाईक,बाबुराव नांगरे,सुधीर बाबर,संतोष जाधव,विलास नांगरे,प्रताप नाईक,प्रकाश लोखंडे,यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.
दरम्यान यावेळी मैदानात प्रामुख्याने पै गोरख पाटील, पै शुभम शेणवी,पै अभि लोखंडे, पै प्रणव जाधव. पै ओंकार पाटील, पै साहिल नांगरे,पै ओम काळे, पै साहिल गुरव,वैभव जाधव,सोन्या भोसले,अक्षय पाटील,नयन माईंगडे,क्षीतीज जाधव,विवेक जाधव,प्रदिप पाटिल,तुषार पाटील आदि मल्लानी चटकदार कुस्त्या केल्या.
यावेळी मैदानात पंच म्हणुन -रंगराव पाटील,रविंद्र नांगरे,दत्ता नाईक,ज्ञानदेव नांगरे,मनोज मस्के,सुरेश पाटील,आदिंनी काम पाहीले.
या कुस्ती मैदानाचे समालोचन सुरेश जाधव यांनी केले.
हे मैदान यशस्वी होण्यासाठी संत सतुबुआ यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.