शिराळा (जी.जी.पाटील)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत वारके यांचा सत्कार करताना बी. टी निकम. शेजारी दिनेश हसबनीस, विकास शहा आदी.
श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था शाखा शिराळा मध्ये संपत वारके यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बढती झालेबद्दल शाखा शिराळा मध्ये यावेळी व्हा चेअरमन श्री बी टी निकम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. या वेळी प्रधान शाखा प्रमुख दिनेश हसबनीस यांनी त्यांच्या कार्याची ओळख करून दिली आणि 20 वर्षा पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी संपत वारके म्हणाले श्री दत्त नागरी पतसंस्थेचे कार्य नेत्रदीपक व अभिमानास्पद आहे, संस्थेचे संस्थापक चेअरमन, विद्यमान चेअरमन, व्हा चेअरमन, संचालक, सेवक वर्ग, धन धनवर्धिनी एजंट यांचे योगदान खूपच सुंदर व महत्त्वपूर्ण आहे. संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. संस्थेच्या १०० कोटी ठेवी साठी शुभेच्छा. कोरोना काळात संस्थेने केलेली ग्राहकांना दिलेली सेवा ही वाखण्याजोगी,अभिमानास्पद आहे, इस्लामपूर DYSP ऑफिस मध्ये CCTV कॅमेऱ्यासाठी LED स्क्रीन साठी श्री दत्त संस्थेने भरघोस मदत केली आहे.
यावेळी उपस्थित श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थाचे सिनियर क्लार्क सौ. वारणा टिंगरे, गणेश पाटील, केदार पोतदार, जगदिश गायकवाड, श्वेता जाधव, विनायक पाटील, प्रकाश रणदिवे, मौला घाशी, मंजिरी देशपांडे, विद्यादेवी आवटे, असावरी हसबनीस, शुभदा जोशी, करण पाटील, सुयोग जोशी, विकास शहा, सभासद खातेदार व हितचिंतक उपस्थित होते आभार जगदिश गायकवाड यांनी मानले.