अन्यथा कायदेशीर आणि आंदोलनात्मक लढा
कोल्हापूर (रुपेश आठवले) – शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राधानगरी शिक्षण प्रसारक मंडळाचे राधानगरी महाविद्यालय येथे प्राचार्य नियुक्तीची प्रक्रिया चालू आहे परंतु कायदेशीर बाजू डावलून शंका निर्माण होईल अशा पद्धतीने प्रक्रिया राबवली जात आहे असा आमचा दावा आहे ही निवड पारदर्शक आणि निपक्षपातीपणे करावी अन्यथा संसदीय मार्गाने कायदेशीर लढा आणि जनआंदोलन सुद्धा उभा केले जाईल असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव व आंबेडकरी चळवळीचे नेते प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी शिवाजी विद्यापीठ प्रभारी कुलगुरूसो यांना भेटून निवेदन सादर केले आहे.
शिवाजी विद्यापीठ हे शिक्षण क्षेत्रातील उच्च दर्जाचे आणि पश्चिम महाराष्ट्रात आदर्श असे शासकीय शैक्षणिक स्थळ आहे.या विद्यापीठामार्फत शैक्षणिक कारभार पारदर्शक व्हावा निपक्षपातीपणे व्हावा कायदेशीर मार्गाने व्हावा अशी अपेक्षा आहे. शिवाजी विद्यापीठांमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राचार्य नियुक्तीच्या निकषांमध्ये सध्या राधानगरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राधानगरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या नियुक्तीच प्रक्रिया चालूकेली आहे. सदर प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी ठेवून आचारसंहितेच्या कालावधीत या जाहिरातीचे प्रसारण किंवा अंमलबजावणी केलेली आहे. सदरची जाहिरात शिवाजी विद्यापीठ वेबसाईटवर केवळ दोनच दिवस ठेवण्यात आलेली आहे ही जाहिरात पंधरा दिवस वेबसाईटवर ठेवणे आवश्यक असताना केवळ दोनच दिवस का जाहिरात ठेवली आणि मुदत संपण्यापूर्वीच काही इच्छुकांना प्राचार्य पदासाठी मुलाखतीचे पत्र पाठवण्यात आलेले आहे. असा प्रश्न उपस्थित करू इच्छितो, की प्राचार्य निवडीकरिता शिवाजी विद्यापीठाकडून रीतसर मान्यता घेतलेली कमिटी नियुक्त झाली का या निवडीच्या छाननी करीता तीन प्राचार्यांची संयुक्त समिती नेमण्यात आली का आणि पात्रता यादी शिवाजी विद्यापीठाकडे पाठवून मान्यता घेतली का शिवाजी विद्यापीठाने या यादीला मान्यता दिल्यानंतर मुलाखतीसाठीचे प्राचारण पत्र देणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे त्यामुळे यासंदर्भात आम्ही शिवाजी विद्यापीठाचे घाई घाईने केलेल्या प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त करत आहोत.
शिवाजी विद्यापीठाचा दर्जा कार्यपद्धती पाहता प्राचार्य निवडीकरिता तंतोतंत कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी होणे आवश्यक असताना सुद्धा घाईघाईने कुणाच्या दबावाखाली आणि कुणाच्या इशाऱ्याने अशा पद्धतीची निवड केली जात आहे हा प्रश्न गंभीर आहे. म्हणून आम्ही आंबेडकरी समाज पक्ष संघटना जन आंदोलनाच्या वतीने मागणी करतो की सदरची निवड प्रक्रिया कायदेशीर बिनचूक पद्धतीने आणि निसंशय पद्धतीने पार पाडावे याकरिता पंधरा दिवसाची मुदत देऊन अजूनही अर्ज मागविण्यात यावे या अर्जांची छाननी अधिकृत प्राचार्य कमिटीच्या वतीने व्हावी मगच मुलाखतीचे पाचरण पत्र पाठवण्यात यावे अन्यथा कुणाच्यातरी इशाऱ्यावर ही प्रक्रिया अशीच चालू ठेवली तर मात्र आम्हाला या संदर्भात आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल तसेच गरज भासल्यास आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढून या मागचे मास्टरमाईंड शोधून काढू या मागणीचे निवेदन प्रभारी कुल गुरू सो आणि सचिव शिवाजी विद्यापीठ तसेच संलग्नता विभाग यांना दिलेले आहे निवेदनावर प्राध्यापक शहाजी कांबळे माननीय संजय जिरगे जिल्हा उपाध्यक्ष रिपाई आठवले माननीय कृष्णात सडोलीकर अध्यक्ष एम्प्लॉईज फेडरेशन माननीय पुंडलिक कांबळे भामटेकर जिल्हा संघटक मलिक चिकदुळ आदींच्या सह्या आहेत.

















































