बेरडेवाडी येथे आले क्रांतिकारक, पहा कोण होते?

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

जिल्हा परिषद शाळा बेरडेवाडी येथे अवतरले क्रांतिकारक

शिराळा (जी.जी.पाटील)

*वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धेतून नृत्याविष्कारातून साजरा केला भव्य प्रजासत्ताक दिवस*

*जिल्हा परिषद शाळा बेरडेवाडी येथे 74 वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वनिता विनोद बेरडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वनिता दत्तात्रय बेरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शहीद भगतसिंग , लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, यांची वेषभूषा परिधान करून देशभक्तांची यशोगाथा आपल्या वक्तृत्वातुन सादर केली. तसेच देशभक्तीपर गीतावर नृत्य करून उपस्थितांच्या डोळ्यातील पारणे फेडले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .

VIDEO पहा

https://youtu.be/W-IbbpdXyJM

पालकांनी शाळेच्या भौतिक सुविधेसाठी देणगी देऊन सहकार्य केले यावेळी विनोद बेरडे, कांता कंदारे, योगिता बेरडे मनोगत व्यक्त केले .यावेळी लक्ष्मण कांदारे, ज्ञानेश्वर बेरडे, अनिल सावंत, सर्जेराव बेरडे आदी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे, सूत्रसंचालन उपशिक्षक जितेंद्र लोकरे व आभार सहयोगी शिक्षिका सविता पाटील यांनी केले.*

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.