राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्दच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन
कोल्हापूर : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरू आहे त्याविरूद्ध आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, पापाची तिकटी येथे सकाळी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात आमदार पी. एन. पाटील (सडोलीकर), आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा जयवंत आवळे, शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, शहराध्यक्ष सचिन प्रल्हाद चव्हाण, ऍड. गुलाबराव घोरपडे (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस), शशांक बावचकर (महाराष्ट्र प्रदेश सचिव), संजय पोवार वाईकर (सचिव) यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, शहर ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, इंटक संघटना, ओबीसी सेल, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्यांक सेल, असंघटित कामगार सेल, सांस्कृतिक सेल, परिवहन सेल, रोजगार स्वयंरोजगार सेल, अपंग सेल, माजी सैनिक संघटना, शिक्षक सेल, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.