कोल्हापूरची चित्र परंपरा ही फार जुनी आणि मोठी आहे साधारण दीडशे वर्षांची आहे.
भारतात वास्तववादी चित्र परंपरेत वर्षानुवर्षे काही खास प्रगती दिसत नव्हती. महाभारत रामायणातील त्यात त्याच कथा हिंदू देवतेच्या वर आधारित चित्रे एवढ्या छोट्या परिवारात फिरणारी ही चित्रकला होती ब्रिटिशांच्या राजवटीत युरोप मधून आलेले नवे वारे भारतीय चित्रकारांच्या नव्या पिढीच्या कानात शिरले आणि मग काय विचारता? हे वासरू चौफेर दौडू लागले. त्यांनी परंपरेच्या अनेक कुंपणांना पार केले, काही चौकटी मोडल्यासुद्धा या परंपरेचा इतिहास मोठा अभ्यास करण्यासारखा आहे.
यात बहुतेक तरुणांचा भरणा जादा होता आणि बोटावर मोजता येणाऱ्या मुली सहभागी होत्या. चित्रकलेत दि प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप निर्माण झाला. मॉडर्निझम नावाने तो प्रयोगशील बदला. हा ग्रुप 1947 ला स्थापन झाल्याने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्याचाही अमृतमहोत्सव मुंबईत साजरा झाला. या नव्या चित्र परंपरेचा इतिहास नव्या पिढीने समजून घेण्यासारखा आहे.
कोल्हापूरची चित्र परंपरा ही फार जुनी आणि मोठी आहे साधारण दीडशे वर्षांची. त्यावरचे माझे पुस्तक शिवाजी विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे त्यात अनेक चित्रकारांची चित्रे आणि त्यांचा सविस्तर परिचय आहे. या व्यतिरिक्त मी आबालाल रहमान यांचे छोटे चरित्रही प्रसिद्ध केले. कोल्हापूर चित्र परंपरेचे प्रदर्शन अपेक्स गॅलरी नवी दिल्ली व गोव्यात सर्वप्रथम भरवले कोल्हापूरला गुलमोहर आर्ट गॅलरी म्हणून अनेक चित्रकारांची प्रदर्शने व प्रात्यक्षिकेही केली. दिल्लीतील चित्रप्रदर्शनाला जुन्या पिढीतील दहा-बारा चित्रकार दिल्लीला घेऊन गेलो होतो.
त्यांना नॅशनल गॅलरी दाखवली त्यातील दोघे वयोवृत्त चित्रकावर तोंडावर हात मारत बाहेर आले म्हणाले किती भयानक गोष्ट आहे अमृता शेरगिल बाईने स्वतःची न्यूड पेंटिंग केले आहे. हा एक जुन्या पिढीला मिळालेला कल्चरल शॉक होता त्यांची ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. तसाच शॉक या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपने दिला त्याचे संस्थापक सभासद होते एफ एम सौझा १९२४ ते २००२ एम एफ हुसेन 1915 ते 2011 के एच आरा 1914 ते 1985 एस एच रझा 1922 ते 2016 गाडे 1917 ते 2007 एस के बकरे 1920 ते 2007 यापैकी सौझा, रझा आणि बकरे तिघेही युरोपला 1948 मध्ये गेले त्यानंतर या ग्रुप मध्ये अनेक नवे चित्रकार सामील झाले. त्यात ए रायबा, चपगर, कृष्णा खन्ना, व्ही एस.गायतोंडे, अकबर पद्मसी भानू अथय्या यांचा समावेश होता भानु राजोपाध्ये या कोल्हापूरच्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या पुरोगामी विचारांच्या तरुणांचा हा नवा ग्रुप कार्यरत झाला जे.जे स्कूल ऑफ आर्ट च्या वास्तववादी चित्रपरंपरेशी या मुलांनी केलेले हे बंडच होते. मुंबई त्यावेळेला कापड निर्मिती व विक्रीचे महत्त्वाचे केंद्र बनले होते.
त्या निमित्ताने अनेक लोक विविध जाती धर्म देशाचे तिथे येत त्यांच्यासमोर या तरुणांच्या चित्र प्रदर्शनाने मुंबईची नवी तोंड ओळख जगाला होऊ लागली शिवाय विविध धर्माचे लोक तिथे राहू लागल्याने खऱ्या अर्थाने हे शहर धर्मनिरपेक्ष बनले. हा संस्कार चित्रकलेच्या नव्या परंपरेवर झाला आरा हा चित्रकार दलित होता तर सौदा, हुसेन आणि रजा हे अल्पसंख्यांक गरीब मुस्लिम घरात जन्मले होते. त्यांच्या मनात नवी विचारसरणी रुजली होती त्यामुळे ते स्वतःला प्रोग्रेसिव्ह ग्रुप म्हणत असत. प्रारंभीच्या काळात त्यांनी मुंबईचा फुटपाथ त्यावरील गरीब भिकारी हे चित्र विषय रंगवले.
यात थोड्याच दिवसात अमुलाग्र बदल झाला. त्यांचा संबंध हिटलरच्या छळाला कंटाळून भारतात आलेल्या ज्यू चित्रकारांच्याशी झाला. रुडोल्फ व्हान लीडन, वॉल्टर लॅंगहॅमर आणि ईमॅन्युएल शैलेसिंगर यांनी मुंबईतील चित्रकारांना पाश्चात्य कलाकारांचा परिचय करून दिला सौजाने आपल्या शेवटच्या प्रदर्शनास सांगितले की “माझ्या चित्रकलेला सनातनी लोक कम्युनिस्टाने काढलेली चित्रे म्हणून संबोधू लागले आहेत खरे तर आम्ही स्वतंत्र भारतातले स्वतंत्र चित्रकार आहोत नव्या भारताचे उभारणीत आमची जबाबदारी आहे ” दुर्दैवाने 1956 पर्यंत हा ग्रुप अनेक कारणाने पांगला एम एफ हुसेन यांनी मात्र एक खांबी तंबू राखला. हुसेनने नव्या जुन्या शैलीचा सुरेख संगम साधला.
समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या भेटीने हुसेन बदलून गेले. लोहिया यांनी सांगितलै की” तुमच्या चित्रात खेड्यातील लोकांना आकर्षित करतील असे विषय दाखवा” हुसेनने ते ऐकले तशीचित्रे खूप गाजली. थोड्याच काळात हुसेन जगप्रसिद्ध चित्रकार बनले इकडे जवाहरलाल नेहरूंच्या नंतर भारतीय राजकारणात मोठे बदल झाले आणि या नव्या विचारसरणीच्या ग्रुपला हवा तसा पाठिंबा मिळणे कठीण झाले. एम एफ हुसेन यांना हिंदू धर्माचा विरोधक असे रंगवण्यात आले उजव्या विचारसरणीने त्यासाठी जोर धरला 1985 पर्यंत आरा व इतर चित्रकारांचे निधन झाले होते मात्र बहुजन समाजाच्या सुखदुःखाची समरस झालेला ,त्यांना कागद आणि कॅनव्हासवर चितारणारे हे थोर चित्रकार कालाआड गेले पण त्यांची कला आजही अमर आहे नव्या पिढीला प्रेरणा देत ठाम उभी आहे त्याचा मात्र मागोवा घ्यायला हवा.
शब्दांकन – डॉ. सुभाष के देसाई. कोल्हापूर.