तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
*सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितर समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न नवशैक्षणिक वर्षारंभी शाळा भरली जोशात…*
*चिपळूण:* सहयाद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी- चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी या ISO 9001-2015 मानांकन प्राप्त प्राथमिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीचा दिवस १५ जून या दिवशी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी खेर्डी येथील प्रसिध्द खालू बाजाच्या सुमधुर संगीताच्या तालावर फेरी काढण्यात आली.
यामध्ये ग्रंथ पालखी, विविध घोषवाक्ये, घोषणा, लेझीम, ढोल आदीसह विद्यार्थी मोठया उत्साहात सहभागी झाले होते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ओवाळणी करून शाळेत प्रवेश देण्यात आला. सर्व शिक्षा अभियांनार्तगत मोफत पाठयपुस्तकांचे वितरण शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक प्राधिकरणचे सदस्य डॉ. श्री. राकेश चाळके, दैनिक सागरचे सहसंपादक श्री. सुभाष कदम, खेर्डी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम. वृशाली भुरण, शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अनिल शिंदे, मानसी महाडिक, स्वरा महाडिक, तेजस्वी भुरण व पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. राकेश चाळके यांनी व वृशाली भुरण यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यार्थी कु. वीर कांबळे याने शिक्षणाचे महत्व व कु. आरोही निर्मळ हिने मुलीच शिक्षण यांविषयी भाषण केले. सर्व विदयार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी शाळेची साफसफाई करून रांगोळया व फुलांची सजावट करण्यात आली. शिक्षकांनी वर्गावर्गात मनोरंजक गोष्टी सांगून मुलांचे मनोरंजन केले. तसेच मुलांना गोड खाऊ देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ व उपस्थित मान्यवरांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
नक्कीच मनासारखा व याेग्य दरात मिळणार अनेक प्रकारचे काँम्प्युटर्स व अन्य इलेक्टॅंनिक वस्तू
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.