विभागीय अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभाग यांना निवेदन…
राज्यात दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. बुधवार दि.८ मार्च २०२३ रोजी बोर्डाच्या वेळापत्रकानुसार हिंदीचा विषयाचा पेपर होता. परीक्षा बोर्डाने वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केले आहे. मात्र नवनीत प्रकाशनाने दहावी परीक्षेचे चुकीचे वेळापत्रक छापले असुन त्यावर हिंदी विषयाच्या पेपरची तारीख दि. ९ मार्च २०२३ अशी छापून ते वेळापत्रक राज्यातील अनेक अनुदानीत व खाजगी शाळांना व विद्यार्थ्यांना वितरीत केलेले आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थीं व पालक हेच वेळापत्रक खरे समजून हिंदी विषयाचा पेपर दि.९ मार्च २०२३ रोजीच आहे या भ्रमात राहिले.
महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थांना या पेपरला मुकावे लागले असुन शैक्षणिक नुकसान झाले आहे ही बाब अत्यंत गंभीर असुन खेदजनक आहे.
आमची आपल्याकडे या तक्रार अर्जाद्वारे मागणी आहे की नवनीत प्रकाशन ही एक खाजगी संस्था असताना विद्यार्थांचा भविष्याशी खेळण्याचा घाट नवनीत प्रकाशनाने कशासाठी व का घातला? तसेच त्यांना हा अधिकार कोणी दिला? सदर वेळापत्रक छापण्यापुर्वी शासनाची पुर्व परवानगी नवनीत प्रकाशनाने घेतली होती का? तसेच त्यांना सदर वेळापत्रक छपाई करण्यास कोणी परवानगी दिली ? तसेच नवनीत प्रकाशनास शासकीय कामकाजाचा भाग असलेल्या बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक छपाई करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत का? या बाबत आपल्याकडून तात्काळ चौकशी व्हावी, चौकशी पश्चात हजारो विद्यार्थींचे भविष्य नवनीत प्रकाशनाने उद्वस्थ केले, शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून भा.द.वी.स. कलम ४२०, ३५३ व इतर कलमाद्वारे नवनीत प्रकाशनावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी. व केले चौकशी व झाले कारवाई बाबत आम्हास १० दिवसात लेखी प्रतिउत्तर व्हावे ही नम्र विनंती. अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या विरोधात राज्यभर आंदोलन छेडेल यावेळी कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपण जबाबदार रहाल याची आपण नोंद घ्यावी.