गुड न्यूज महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गांनी खरोखरच दखल घ्यावी अशी ही माहिती आहे. स्वतःला जे जमत नाही ते रस्त्यावर बसलेल्या फळ विक्रेत्यांनी करून दाखवलेले आहे. एरवी हेच फळ विक्रेते नेहमीच अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईला सामोरे जात असतात , पण हेच फळ विक्रेते रस्त्यावर एखादे सामाजिक काम देखील करू शकतात हेच या घटनेवरून दिसून आलेय.
लोकांना होणारी गंभीर इजा आणि मृत्यूचे प्रमाण बघून या मार्केट यार्ड परिसरातील दोन फळ विक्रेते आणि त्यांचा पेंटर मुलगा पूढे सरसावले, आणि एक पांढरा ऑइल पेंट रंगाचा डबा आणून हा गतिरोधक पूर्णपणे पांढऱ्या पट्ट्यांनी रंगवल्याचे पाहायला मिळत आहे. हे काम येथील फळ विक्रेते,हसीना शेख, पेंटर मोहसीन अबू करीम शेख,परविन आलाबश, तहसीलदार नारळ विक्रेते आणि मोहम्मद जाफर अल्लाबक्ष तहसीलदार यांनी स्वखर्चाने पूर्ण करून दाखविले. त्यांनी स्वखर्चाने रंगाचा डबा आणून अखेर हे स्पीड ब्रेकर रंगवायला हातात घेतले आणि ते पूर्ण देखील केले. नक्कीच त्यांनी केलेल्या या सत्कारायची दखल सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी ठरली आहे. या घटनेवरून तरी महापालिका विभागाने सर्व शहरातील स्पीडब्रेकर रंगवणे काळाची गरज आहे. शहरातील अनेक चौकात केवळ झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे व स्पीड ब्रेकर ठळकपणे रंगवलेली नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, याची नोंद देखील कुठे होत नसते. त्यामुळे महापालिकेने जागे व्हावे, अपघात रोखवेत, सध्या सुरक्षा सप्ताह सुरू आहे मात्र या छोट्या-मोठ्या गोष्टींची देखील दखल संबंधित प्रशासन विभागाकडून घेतली जात नाही याला काय म्हणावे.
त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील या फळ विक्रेत्यांच्या सत्कार्याचे कौतुक करायला हवे. एरवी महापालिकेच्या अतिक्रमण विभागापुढे झुकणारे किंवा अतिक अतिक्रमणची कारवाईस सहन करणारे हेच फळ विक्रेते मददतगार देेखिल ठरू शकतात हे लक्षात ठेवा.महापालिकेने यापुढे तरी सतर्क राहून आपले कर्तव्य पारदर्शकपणे पार पाडावे हीच सदिच्छा. पोलीस प्रशासन आणि आरटीओ विभाग तसेच महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग ची व्यवस्था आहे की नाही हे पाहणे गरजेचे असून त्याबाबत तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. |